हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | साक्री तालुका युवासेना प्रमुख बाळासाहेब देवरे यांनी सेना भवन मुंबई येथे युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जवळपास अर्धातासाच्या या भेटीत सरदेसाई यांनी धुळे जिल्ह्यातील युवासेना संघटनात्मक बांधणी या विषयावर मार्गदर्शन केले.
या भेटीविषयी ‘हॅलो महाराष्ट्र’ सोबत बोलताना बाळासाहेब देवरे म्हणाले की “युवासेनेचा राज्याचा कारभार चालवणारे आमचे सचिव वरुणजी सरदेसाई हे माझ्यासारख्या एका तालुका अध्यक्षाला तब्बल अर्धातास वेळ देऊन संघटनेच्या विस्ताराच्या बाबतीत विविध विषयांवर मार्गदर्शन करतात हे खरंच भारावून टाकणारे आहे.या एकाच भेटीतून मला प्रचंड ऊर्जा मिळाली आहे.यापुढे संघटनेच्या कामात खुपचं उत्साहाने आणि जोमाने काम करता येईल. या भेटीवेळी युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन श्रीधर जाधव हे देखील उपस्थित होते.
बाळासाहेब देवरे हे राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे आणि साक्री तालुक्यातील शिवसेना नेते विशालबापू देसले यांचे यांचे कट्टर समर्थक मानले जातात.देवरे यांच्याकडे तालुल्याचे युवासेना प्रमुखपद आल्यावर संघटनेत नवचैतन्य आल्याचे चित्र आहे.देवरे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने लोकांचे प्रश्न सोडवण्यात साक्री तालुका युवासेना अग्रेसर असल्याचे देखील चित्र आहे.