बाळासाहेब पाटलांच्या मंत्रीपदाचा साताऱ्यात जल्लोष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राज्याच्या महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कराडमध्ये फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला.

राष्ट्रवादीकडून मंत्रीपद मिळाल्याबद्दल आमदार बाळासाहेब पाटील यांच्या कुटुंबीयांनी शरद पवार, अजित पवार यांचे आभार मानले. त्याचबरोबर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, पी डी पाटील यांच्या विचारांची परंपरा पुढे नेहतील अशी प्रतिक्रिया आमदार बाळासाहेब पाटील याचे बंधू सुभाषराव पाटील यांनी व्यक्त केली.

Leave a Comment