Saturday, March 25, 2023

राज ठाकरेनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सर्वांच्या नजरा

- Advertisement -

टीम हॅलो महाराष्ट्र । शिवसेनेच्या वचनपूर्ती मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जंगी सत्कार होणार आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.

दरम्यान, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यव्यापी महाअधिवेशन पार पडत आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणात आपल्या पक्षाची राजकीय भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रात शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात महाविकास आघाडी स्थापन केली मात्र आत्तापर्यंत त्यांनी या सगळ्या प्रयोगाबाबत काहीही भाष्य केलं नव्हतं. महाधिवेशनावेळी केलेल्या भाषणात याबाबत काही बोलणार नाही असं राज ठाकरे यांनी सांगितले. मात्र आपल्या भाषणात मी रंग बदलून सरकारमध्ये जाणारा नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.तेव्हा आजच्या सत्कार सोहळ्यावेळी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना उत्तर देतील का? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

- Advertisement -

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

महाअधिवेशनात राज ठाकरेंचा फुसका बार; माध्यमांतील फुटेज खात, जुन्याच गोष्टी सांगत केली ‘महानिराशा’

‘मी झेंड्याचा रंग बदलला, रंग बदलून सरकारमध्ये गेलो नाही!’; राज ठाकरेंनी लगावला शिवसेनेला टोला

राज ठाकरेंचा CAA ला पाठींबा; CAA, NRC समर्थनार्थ 9 फेब्रुवारीला मनसेचा मोर्चा