नवी मुंबईतील विमानतळाला ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांचं नाव – एकनाथ शिंदे

balasaheb thackarey airport
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवी मुंबई विमानतळ नामकरणाबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवी मुंबई विमानतळास शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सिडकोने मजूर केला असल्याची माहिती राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर भविष्यातील दुसऱ्या मोठ्या प्रकल्पाला दिवंगत खासदार दि. बा. पाटील यांचं नाव दिलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संघर्ष समितीला दिलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले, नवी मुंबई विमानतळास इतर कोणाचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव या आधी आला नव्हता. त्यामुळे आलेल्या प्रस्तावानुसार या विमानतळास शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय सिडकोने मंजूर केला आहे. आता काही लोक दि. बा. पाटील यांच्या नावाची मागमी करत आहेत. आम्हाला दि. बा. पाटील यांच्याबद्द आदरच आहे. त्यामुळे नवी मुंबईत भविष्यात उभारण्यात येणाऱ्या एखाद्या मोठ्या प्रकल्पास देण्याबाबतचा प्रस्ताव प्रकल्पग्रस्त कृती समितीने पाठावावा, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यावर राज्य सरकार ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला स्थानिक नागरिक शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते दि.बा पाटील यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी करत आहेत. त्यामुळे आता स्थानिक नागरिक व राज्य सरकारमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.