“चंद्रकांत पाटील तुम्ही किती कामं केलं कागदावर सांगा”; बाळासाहेब थोरातांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसापूर्वी महसूल मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी तुम्ही कोरोना काळात कुठल्या बिळात लपला होता हे लोकांना माहिती आहे. कोरोना काळात भाजप कार्यकर्ते फिल्डवर होते, अशी टीका केली होती. त्यांच्या टिकेवरून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पाटील यांना टोला लगावला. “चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावरती बोलण्याआधी तुम्ही कोरोना काळात किती काम केलं हे कागदावर सांगावे, असा टोला थोरात यांनी लगावला आहे.

मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी कोरोना काळात काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो त्याचबरोबर महसूलमंत्री म्हणून जिल्हा यंत्रणा सांभाळत होतो. या काळात सर्व ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते काम करत होते. तरीही कोरोना काळात वाढलेल्या कोरोनावरून टीका केली जात आहे.

सध्या महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करत आहे. ते पडण्याची कुठलीही शक्यता नाही. भाजपचे नेते जरी बोलत असले तरी त्यांनी कार्यकर्ते आणि त्यांच्या आमदारांसाठी बोलावं लागतं त्याशिवाय कार्यकर्ते, आमदार राहणार नाहीत. आज मोठ्या प्रमाणात केंद्रीय तपास संस्था वापरल्या जात आहेत. त्याचा वापर करून एखाद्याच्या कुटुंबियांपर्यंत तपास करुन त्रास देणं हे निश्चित दुर्देवी आहे. लोकशाहीमध्ये मतमतांतरे असू शकतात पण त्याचा असा गैरवापर करू नये अशी अपेक्षा असते. पण भाजप तेच काम आता करत आहे.

गोव्यामध्ये परिवर्तन हे निश्चित – थोरात

गोवा विधानसभा निवडणुकीमुळे गोवा तसेच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात गोव्यात भाजपच्याच सत्ता येणार असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. या दरम्यान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी गोवा विधानसभा निवडणुकीतील विजयाबाबत मोठे विधान केले आहे. गोव्यामध्ये भाजप सरकार ज्या पद्धतीने चालले आहे. त्याला लोक कंटाळली आहेत. या ठिकाणी यंदा परिवर्तन निश्चित आहे, असे थोरात यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment