थोरातांनी आत्मपरीक्षण करावं; विखेंचा थोरातांना सल्ला

संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी। अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागात विखे आणि थोरात वाद सर्वानाच माहिती आहे. त्यात बुधवारी निळवंडे धरणाच्या भूमिपूजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे उपस्थित राहणार होते. त्यामुळे बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यात विखेंच्या हस्ते भूमिपूजन ही बाब थोरात समर्थकांना खटकली.

त्यामुळे त्यांनी विखे ज्या रस्त्याने जाणार होते त्या रस्त्याला आडवे होऊन थोरात यांच्या समर्थांनी घोषणा देत विखेंना जोरदार विरोध दर्शविला होता. या प्रकरणानंतर विखेंनी मध्यमाशी बोलताना,’थोरातांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे’ विखेंनी मत व्यक्त केल. आता विखेंच्या सल्ल्याला बाळासाहेब थोरात काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.