बाळासाहेबांचं AI भाषण, बावनकुळे म्हणतात हा तर पोरकटपणा

Uddhav Thackeray (2)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट – Uddhav Thackeray) च्या नाशिक येथील शिबिरात एआयच्या (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण पुन्हा एकदा ऐकवण्यात आले. विशेष म्हणजे या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर बाळासाहेबांच्या आवाजात स्पष्टपणे टीका करण्यात आली. यामुळे उपस्थित शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पण आता यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अन त्यावर एक ट्विट करून टीका केली आहे.

बावनकुळे यांनी ट्विटरवरून टीका –

बावनकुळे यांनी ट्विटरवरून टीका करत म्हटले की, “आपला आवाज कुणी ऐकत नाही, म्हणून आपले विचार हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा फक्त आणि फक्त ‘उबाठा’सारखा गटच करू शकतो.”

बाळासाहेबांचा आवाज वापरु नये –

बाळासाहेबांना जनाब ठरविले, ज्यांनी टिपू सुलतानाचे नावं उद्यानांना दिली, वीर सावरकरांचा सकाळी अपमान करणार्‍या राहुल गांधींच्या गळ्यात सायंकाळी गळे घातले. वक्फच्या विरोधात मतदान केले, राममंदिराला सातत्याने विरोध करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसले , 370 रद्द करणार्‍याला विरोध करणार्‍यांना पाठिंबा दिला, वाझेसारख्यांकडून वसुली करवून घेतली, डेडबॉगी बॅगमध्येही घोटाळे केले, कोविड काळात खिचडीत घोटाळे केले, मराठी माणसांच्या घरात घोटाळे करुन गल्ले भरले, त्यांच्या बुडावर बाळासाहेबांनी लाथच घातली असती.

“ज्या गोष्टींसाठी वंदनीय बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, किमान त्याच्या विरोधात बाळासाहेबांचा आवाज वापरु नये. त्यांचे विचार बुडविलात. किमान मृत्यूनंतर त्यांच्या आवाजाचा असा गैरवापर करु नका” असे देखील देशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

भाजपा अन पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका –

AIच्या साहाय्याने सादर करण्यात आलेल्या भाषणात बाळासाहेबांच्या आवाजात भाजपा अन पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका करण्यात आली. “नाशिक म्हटले की गर्दी उसळते, कारण शिवसेना अन नाशिक यांचे नाते जुने आहे,” असे या भाषणात सांगण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदींची खिल्ली उडवत, “मोदी म्हणाले असते कि,नाशिक और मेरा पुराना नाता है, मैने सावरकरजी के साथ मिलकर जॅकसन का वध किया, मेरा ही प्लॅनिंग था… जातील तिथे गंडवतील,” अशा शब्दांत टोले लगावण्यात आले.

भाजपविषयी बोलताना, “भाजपला कोणी ओळखत नव्हते. आम्हीच त्यांना जवळ केले. पण ही नाती जपणारी माणसे नाहीत. ‘कमळाबाई’ म्हणजे ढोंग आहे,” असे मत व्यक्त करण्यात आले.