संतापजनक! यूपीत आणखी एक सामूहिक बलात्कार; रेप करून दलित मुलीचे पाय तोडले

बलरामपूर । उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटना ताजी असताना आता यूपीत आणखी एक बलात्काराची घटना घडली आहे. दलित मुलीवरील सामूहिक बलात्कार करून तिचे पाय तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये एका २२ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. Balrampur Rape Victim

हाती आलेल्या माहितीनुसार, दोन मित्रांनी मैत्रीच्या बहाण्याने दलित मुलीला बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हे घृणास्पद कृत्य केल्यानंतर दोन्ही आरोपींनी तिची कंबर आणि पाय मोडले. यानंतर या मुलीला रिक्षातून घरी पाठवले. नंतर तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तिला आधी इंजेक्शन दिलं गेलं आणि मग तिच्यावर आत्याचार केला गेला, असा पीडित मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. प्रचंड वेदना होत आहेत. आता मी वाचू शकणार नाही, असं गंभीर अवस्थेत आलेल्या मुलीने मृत्युपूर्वी म्हणाल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. या प्रकरणातील एका आरोपीचे नाव शाहिद आहे. तर दुसऱ्या आरोपीचं नाव साहिल आहे. दोघेही गैंसडीचे राहणारे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

या प्रकरणात तातडीने कारवाई करून दोन्ही आरोपींना अटक केल्याचं बलरामपूर पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणात पीडितेचे हात, पाय आणि कंबर तोडल्याची बाब चुकीची नाही, असं पोलिसांनी म्हटले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये याची पुष्टी झालेली नाही. Balrampur Rape Victim

पीडित मुलगी महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. तिच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गंसडी कोतवाली परिसरातील आहे. बी-कॉमच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी पचपेडव्याच्या महाविद्यालयात गेला होती. सायंकाळी एका रिक्षाचालकाने मुलीला बेशुद्ध अवस्थेत तिच्या घराजवळ सोडलं. कुटुंबीयांनी मुलीला रूग्णालयात तातडीने दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण वाटेतच तिचा मृत्यू झाला. महाविद्यालयातून परतत असताना मुलीचं अपहरण करण्यात आलं आणि गंसडी शहरातील एका खोलीत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला गेला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. Balrampur Rape Victim

You might also like