सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
वाद्याच्या गजरात आणि भंडाऱ्याची उधळण करत बाळूमामाची पालखी आज सातारा येथील खासदार उदयनराजेंच्या ‘जलमंदिर’ या निवासस्थानी दाखल झाली. यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी पालखीचे स्वागत करत पालखीचे दर्शन घेतले.
यावेळी खा. उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पारंपारिक वाद्य वाजवत भंडाऱ्याची उधळण करत बाळूमामाच्या नावानं चांगभलंचा जयघोष यावेळी भाविकांनी केला.
भंडाऱ्याच्या उधळणीत बाळुमामाची पालखी उदयनराजेंच्या जलमंदिरात दाखल pic.twitter.com/TB13bpURIa
— santosh gurav (@santosh29590931) March 5, 2023
यावेळी बाळुमामाची पालखी जलमंदिर पॅलेस येथील देवीच्या दर्शनाला आणण्यात आली. जलमंदिर येथील देवीच्या दर्शनानंतर भाविकांनी ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ असा जय जयकार केला. यावेळी जलमंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली होती.