हभप बंडातात्या सातारा शहर पोलिस ठाण्यात आले आणि गेले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा येथे जमावबंदी आदेशाचा भंग करून दंडुका, दंडवत आंदोलन करणे व खा. सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे या महिला नेत्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले होते. याविषयी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशीसाठी ह. भ. प बंडातात्या कराडकर आज बुधवारी दि. 9 रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. सातारा पोलिस ठाण्यात आले आणि केवळ अर्धा तासात गेले.

राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी व्यसन मुक्त युवक संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच वारकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. यावेळी बंडातात्या कराडकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या महिला नेत्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. सातारा शहर पोलिसांनी जमावबंदी आदेशाच्या भंगाचा गुन्हा बंडातात्यासह 125 जणांवर दाखल केला होता. तसेच महिला नेत्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव यांनी सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यांच्या अनुषंगाने चौकशीसाठी सातारा पोलिसांनी बंडातात्यांना आज बोलावले होते. त्यानुसार बंडातात्या आज सातारा शहर पोलिसात दाखल झाले आहेत. या दोन गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपासी अधिकाऱ्यांने चौकशी केली. त्यानंतर अर्ध्या तासातच बंडातात्या निघूनही गेले.

Leave a Comment