हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मालिकांच्या जगतात अशी अनेक पात्रे आहेत जी मालिका संपल्यानंतरही अनेको वर्ष प्रेक्षांच्या मनावर अधिराज्य गाजवीत असतात. नुकताच मालिका विश्वाला एक मोठा दुःखद धक्का पचवावा लागत आहे. साराभाई व्हर्सेस साराभाई, बंदिनी, एक हजारों में मेरी बहना है या मालिकांसह अनेक मालिकांमध्ये झळकलेल्या टेलिव्हिजन अभिनेत्री तरला जोशी यांचे निधन झाले आहे. त्यांनी रविवारी जगाचा निरोप घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे हार्ट अटॅकमुळे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर त्यांचे चाहते सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
https://twitter.com/_Indiaupdates/status/1401832653339258881
टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा हिने तरला जोशी यांच्या निधनाची माहिती तिच्या अधिकृत ट्विटर सोशल मीडियावरून दिली आहे. निया शर्माने तरला जोशी यांच्यासोबत एक हजारों में मेरी बहना है या मालिकेत एकत्र काम केले होते. निया शर्माने तरला जोशींच्या निधनाची बातमी देताना लिहिले कि, RIP बडी बीजी… तुमची आठवण येईल. तरला जी तुम्ही नेहमी बडी बीजी राहाल. तरला जोशींच्या निधनाचे वृत्त पसरताच अनेक प्रेक्षकांची यावर शोक व्यक्त केला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Shall fondly remember her as our badi beeji❤️ always🙏 https://t.co/pDwDP9VzDz
— NIA SHARMA (@Theniasharma) June 6, 2021
ज्येष्ठ अभिनेत्री तरला जोशी या टीव्ही मालिका विश्वात छोट्या पडद्यावर ‘बा’ म्हणून अतिशय प्रचलित होत्या. त्यांनी बंदिनी, साराभाई व्हर्सेस साराभाई आणि एक हजार में मेरी बहना है या आणि यांसारख्या अश्या अनेक मालिकांमध्ये घरातील मोठ्या अथवा ज्येष्ठ व्यक्तिमत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र त्यांना खरी ओळख एकता कपूरच्या बंदिनी या मालिकेतून मिळाली होती. तर एक हजार में मेरी बेहना है या मालिकेत त्यांनी अभिनेत्री निया शर्मा आणि क्रिस्टल डिसूझा यांसोबत काम केले होते.