Bandra Railway Station | वांद्रे टर्मिनसवर लोकांच्या चेंगराचेंगरीत 9 जण जखमी; एकाची मांडी फाटली तर एकाच मोडला हात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bandra Railway Station | सोशल मीडियावर अनेक बातम्या व्हायरल होत असतात. अशातच एक सगळ्यात मोठी आणि धक्कादायक घटना घडलेली आहे. ती म्हणजे वांद्रे (Bandra Railway Station) टर्मिनस रेल्वे स्थानकावर प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झालेली आहे. आणि यामध्ये नऊ जण जखमी झालेले आहेत. प्रवाशांच्या या घटनेमुळे या 9 जनांची परिस्थिती देखील गंभीर आहे. सगळ्या रुग्णांवर रुग्णालयात उच्चार देखील चालू झालेले आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून ही घटना किती गंभीर रित्या घडल्याची आपल्याला माहिती मिळते.

हाती आलेल्या माहितीनुसार वांद्रे टर्मिनसवर (Bandra Railway Station) ही चेंगराचेंगरीची घटना घडलेली आहे. सकाळी जवळपास सहाच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. वांद्रे टर्मिनसवर पहाटे गोरखपुरला जाण्यासाठी रेल्वे लागते. परंतु ही रेल्वे अनारक्षित असते. म्हणून या रेल्वेने जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात असते. जे लोक मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशला जातात ते लोक या रेल्वेतून प्रवास करत असतात. दिवाळी आणि छटपूजा लवकरच तोंडावर आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नोकरीच्या निमित्ताने आलेले अनेक लोक त्यांच्या गावी जात असतात. गोरखपुरला जाणाऱ्या या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या लोकांसोबत ही घटना घडलेली आहे. रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. आणि या गर्दीमुळे ही घटना घडलेली आहे.

Bandra Station Update : वांद्रे ते गोरखपुर एक्स्प्रेसमध्ये चढणाऱ्यांची गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी

गोरखपुरला जाणाऱ्या या रेल्वेमध्ये चढण्यासाठी प्रवाशांमध्ये खूप गर्दी झाली आणि मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी घडली. या चेंगराचेंगरीमध्ये जवळपास 9 लोक जखमी झालेले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती देखील गंभीर आहे. ही अत्यंत हृदयद्रावक घटना घडलेली आहे. प्रवाशांमधील एकाची मांडी फाटलेली आहे. एका प्रवासाचा हात तुटलेला आहे तसेच लोक काही लोकांचे कपडे देखील फाटलेले आहेत. प्रवाशांच्या कमरेला मार लागलेला आहे. तसेच प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात रक्त देखील सांडलेले आहे.