कोरोना आणि गरिबीमध्ये उध्वस्त होत चाललेली बांगलादेशी जनता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लढा कोरोनाशी | दक्षिण बांगलादेशमधील बांधकाम कामगार इमाम हुसेन कोरोना विषाणूमुळे करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे जास्तीत जास्त घरी बसून वैतागला आहे. हातात कोणतेच फायदेशीर काम नाही, तो त्याच्या कुटुंबातील चार लोकांच्या चिंतेत आहे. जी काही थोडीफार बचत होती ती ही  झपाट्याने संपत आहे. हुसेन, ५० वर्ष , जेव्हा त्यांना त्यांच्या शेजाऱ्यांकडून बोलावणे येते तेव्हा कायद्याकडे कानाडोळा करून कधीकधी कामासाठी बाहेर जातात. स्थानिक यंत्रणेने बांधकाम साहित्याच्या पुरवठ्यामध्ये व्यत्यय आणत मुख्य रस्ते आणि पूल कुंपणाने बंद केले आहेत. ” मी फक्त संचारबंदी संपण्याची वाट बघत आहे.”  आमच्या एका पत्रकारांशी फोनवर बोलताना ते म्हणाले, दक्षिणेकडील जिल्हाच्या पिरोजपूर गावातून एक गरीब म्हणाला, “मला कोणतीच सरकारी मदत मिळाली नव्हती, मी मागितलीही नव्हती, मला कुणाकडे मागायची हे सुद्धा माहित नव्हते.” ज्या देशातील ४ पैकी १ माणूस अजूनही गरिबीला सामोरा जातो आहे, जिथे बहुतांशी लोकांचे आयुष्य हे त्यांच्या कमाईवर अवलंबून आहे अशा ठिकाणच्या आयुष्यात कोरोना विषाणूच्या शक्तीने उलथापालथ निर्माण केली आहे. हुसेन यांची स्थिती येणाऱ्या काळात गरिबाना जखडणाऱ्या उपासमारीचे अव्यक्त क्षण स्पष्टपणे सांगत आहेत. विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी बांगलादेशने त्यांची संचारबंदी २५ एप्रिलपर्यंत वाढविली आहे. या देशामध्ये आतापर्यंत ४८० रुग्णांची नोंद झाली आहे. पैकी ३० लोकांचे मृत्यू झाले आहेत. संचारबंदीमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे आर्थिक हाल होत आहेत. मार्चच्या शेवटी संचारबंदी लागू होण्यापूर्वी अनेक कामगारांनी जास्त रुग्णसंख्येची शक्यता असणाऱ्या ठिकाणापासून दूर सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी ढाका सोडले आहे. मागच्या आठवड्यात वस्त्रोद्योग कारखान्यात काम करणाऱ्या अनेक कामगार कारखाना बंद होणार असल्याच्या अफवेने आपले काम वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागे वळले. सरकारकडून सामाजिक अलगावची अंमलबजावणी होत असताना नदीकाठाने गर्दीतून पायी प्रवास करून आलेल्या हताश कामगारांचे चित्र खूप धक्कादायक होते. युरोप आणि यु.एस मधील ३.११ दशलक्ष डॉलरची मागणी कोरोना विषाणूमुळे रद्द करण्यात आल्यामुळे वस्त्रोद्योग विश्वात कामगारांना गंभीर रूपात कामाचा दुष्काळ पाहावा लागण्याचा संभव आहे.

संचारबंदी रेंगाळत असताना विषाणूच्या पूर्व काळापेक्षा जास्त लोक उपाशीच झोपत आहेत. 

संकटकाळातील सहानुभूती – या सगळ्या त्रासांचा तपशील सांगत असताना खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. सामुदायिक प्रयत्न करण्यास सुरुवात झाली आहे. ढाकाचे रहिवासी मोहम्मद बहरूल अलाम यांनी त्यांच्या मित्र आणि सहकाऱ्यांच्या मदतीने गरीब स्थलांतरित कुटुंबाना अन्नाची पाकिटे देण्यास सुरुवात केली आहे. विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यावर लगेचच त्यांनी ५० पाकिटांपासून सुरुवात केली होती, ती संख्या सातत्याने वाढवून ७० झाली आहे. त्यांनी सांगितले, “माझ्या बायकोला याबद्दल शंका होती, तिने मला अन्नाचा पुरवठा संपल्यावर काय होईल असे विचारले. मी तिला आपण बरे होऊ असे आश्वासन देत शांत केले. माझे मित्र माझ्यासोबत उभे राहिले.”  फक्त गरीबच नाहीत जे संचारबंदीच्या काळात सहन करीत आहेत, मध्यमवर्गीय लोकसुद्धा मूकपणे सहन करत आहेत. अलाम यांनी यावर एक मार्ग शोधला. कामगारांचे दोन समूह करून रात्रीच्या वेळी त्यांच्या घरी अन्न पोहोचविण्यासाठी स्वयंसेवक नेमले. जागतिक बँकेच्या ढाका शाखेत काम करणाऱ्या अलाम यांनी त्यांच्या फेसबुकवरच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, ” संचारबंदीच्या ते ज्या समस्या सहन करत आहेत ते व्यक्त करू शकत नाहीत.” निराधार मुलींसाठी २०१८ मध्ये स्थापन झालेल्या ट्रिप्टो फौंडेशन या विनानफा संस्थेकडून त्यांचे हे सामूहिक प्रयत्न समजले. 

दरम्यान बांगलादेश सरकारने कोरोना विषाणूवर प्रभावी उपायांसाठी ७२७.५ टका आर्थिक पॅकेज आणले आहे. जे देशाच्या एकूण घरगुती उत्पन्नाच्या २.५%  इतके आहे. ५ एप्रिल रोजी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान शेख हसीना यांनी विषाणूच्या कमी आर्थिक गटातील लोकांवर होणारे संभाव्य परिणाम नोंदवून येत्या काही दिवसात अर्थव्यवस्था घसरण्याचा इशारा दिला. आर्थिक घसरणीवर मर्यादा आणण्यासाठी लघु आणि मध्यम  उद्योगांच्या समावेशासोबत व्यवसायासाठी वित्तीय आणि कमी किमतीचे कर्ज देण्यास प्राधान्य दिले जाईल, दारिद्र्यरेषेखालील गरीब लोकांच्या पायाभूत गरजासाठी सामाजिक सुरक्षितता कार्यक्रम वाढविण्यात येईल, असे पंतप्रधान शेख हसिना यांनी सांगितले. पण प्रश्न असा की सरकारी मदत या रोगामुळे झालेले प्रचंड नुकसान भरून काढण्यासाठी पुरेशी आहे का? एका अहवालात, फिच सोल्युशन यांनी म्हटले आहे, हे स्वस्त कर्ज बांगलादेशमधील उदासीन आर्थिक क्रिया दूर करण्यासाठी थोडी मदत करतील. संचारबंदीचे वाईट परिणाम दिसून येत आहेत, अनेक लोक मोठ्या प्रमाणात पूर्वीपेक्षा आता उपाशी झोपत आहेत. सामाजिक अलगाव एक चैन आहे, जी प्रत्येकजण करू शकत नाही. संचारबंदी रेंगाळली तर कदाचित हुसेन यांना त्यांच्या शेजारच्या देशात काम शोधण्यासाठी जबरदस्ती बाहेर पाठवले जाईल. काही भागांमध्ये सरकारकडून मदत वितरित केली जात आहे. पण हुसेन यांच्यासारख्या लोकांना मूकपणे हे सहन करावे लागेल. त्यांच्यासाठी अलाम यांच्यासारखे सामुदायिक प्रयत्न करण्यारे लोक, जे रात्री त्यांच्या घरी अन्नाची पाकिटे पोहोच करतात, तेच एक आशेचा किरण आहेत.

अनुवाद – जयश्री देसाई – 9146041816

Leave a Comment