हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानला त्यांच्याच देशात जाऊन चारीमुंड्या चित करणाऱ्या बांगलादेशची नजर आता भारतावर आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिका सुरु होणार असून यासाठी बांगलादेशचे आपल्या संघाची घोषणा केली आहे. नजमुल शांतो याचीच पुन्हा एकदा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर दिग्गज अष्टपैलू शाकिब अल हसन याच्यावर हत्येचा गुन्हा असूनही त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने अतिशय हुशारीने आणि भारतीय परिस्थितीत सूट होणार संघ निवडला आहे.
नजमुल हुसेन शांतो, महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, मोमिनुल हक हे प्रमुख फलंदाज बांगलादेशच्या संघात असतील. मुशफिकुर रहीम आणि लिटन दास हे दोन मुख्य यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडतील. तर शकीब अल हसन आणि मेहिदी हसन मिराझ यांसारखे जागतिक दर्जाचे अष्टपैलू बांगलादेशच्या चमूत आहेत. गोलंदाजी विभागात तैजुल इस्लाम, नईम हसनसारखे भारतीय खेळपट्टी वर फलंदाजांना नाचवण्याची क्षमता असलेले फिरकीपटू आहेत तर हसन महमूद, तस्किन अहमद, सय्यद खालेद अहमद सारखे तेज गोलंदाजांना भारताविरुदधच्या मालिकेसाठी निवडण्यात आले आहे.
Bangladesh Test Squad for the India Tour 2024#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #INDvsBAN pic.twitter.com/1npeXGgkix
— Bangladesh Cricket (@BCBtigers) September 12, 2024
असा आहे बांगलादेशचा संघ –
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन कुमेर दास, मेहिदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा , जाकेर अली, हसन महमूद, तस्किन अहमद, सय्यद खालेद अहमद.
भारताचा संघ पहा-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल , सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज , आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.