Bangladesh Violence | सध्या बांगलादेशमध्ये हिंसक असे आंदोलन चालू झालेले आहे. आणि या आंदोलनाचा परिणाम अगदी जागतिक स्तरावर देखील होत आहे. या आंदोलनानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. आणि त्यांनी हा देश देखील सोडलेला आहे. सध्या त्या भारतामध्ये आलेल्या आहेत. परंतु अनेकांना हा प्रश्न झालेला आहे की, अचानक बांगलादेशमध्ये ही परिस्थिती कशी उद्भवली? हाती आलेल्या माहितीनुसार यामागे दोन देशांनी खंडणी केल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये पाकिस्तान एजन्सी आयएसआय आणि चीनचा हात असल्याचे गुप्तचर यंत्रणेकडून माहिती मिळालेली आहे. जमात- ए- इस्लामी संघटनेची विद्यार्थी शाखा असलेल्या इस्लामिक स्टुडंट कंपनी बांगलादेशात हे आंदोलनाला स्फोटक वळण लावलेले आहे. त्यासाठी या संघटनेला चीन आणि पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात फंडिंग केले जात असल्याचे देखील समोर आलेले आहे.
भारत विरोधी संघटना | Bangladesh Violence
जमात- ए- इस्लामी ही संघटना भारताविरुद्ध देखील काम करते. भारता विरोधात कट रचनात ही संघटना नेहमीच काम करत असते. या संघटनेच्या विद्यार्थ्यांनीच बांगलादेश मधील हे आंदोलन एक हिंसक वळणावर नेलेले आहे. त्यांनी शेख हसीन यांच्या जागी पाकिस्तान आणि चीन समर्थक यांचे सरकार आणण्याचे काम केलेले आह इस्लामी स्टुडन्ट कॅम्प यांनी या आधीच्या बाबतचा कट देखील रचला होता. देशामध्ये हिंसाचार वाढवणे हा त्यांचा उद्देश सुरुवातीपासूनच होता. या काही ओघाने झालेल्या गोष्ट नाही. हे पूर्ण प्लॅनिंगने त्यांनी आधीपासूनच केले होते. अशी माहिती गुप्तचर विभागाकडून समजलेली आहे.
देशातील परिस्थिती अस्थिर करणे आणि हसीना यांना राजीनामा द्यायला लावणे. यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे देण्यात आलेले होते. आणि हा त्यांच्या प्लॅनिंगचा एक खूप मोठा भाग होता. पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या चिनी संस्थाकडून देखील हा निधी पुरवण्यात आलेला आहे. शेख हसीना यांच्या आधीपासूनच भारतासोबत चांगले संबंध होते. आणि चीनला भारतापासून तर आशिया खंडातील देश दूर करायचे आहे. त्यामुळे चीन देखील हा प्रयत्न करत आहे. शेख हसीना यांनी देशांमध्ये तब्बल पाचव्यांदा सत्ता स्थापन केली होती. तरी देखील देशातील आक्रमक परिस्थिती वाढल्याने त्यांना ही सत्ता सोडायला लागलेली आहे.
इस्लामिक स्टुडन्ट कॅप ही भारतीय सीमा भागात प्रभाव वाढवण्याचा देखील प्रयत्न करत आहे. भारताविरुद्ध कटकारस्थान करण्यासाठी ही संघटना नेहमीच सक्रिय असत. परंतु भारतीय गुप्तचर संघटनेने या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवलेले होते. ही संघटना बांगलादेशात काम करत असली, तरी ती मूळ पाकिस्तानमधूनच चालते. पाकिस्तानमधून या सगळ्या गोष्टींचे प्लॅनिंग केले जाते. आणि याचाच परिणाम म्हणून आज बांगलादेशाने अत्यंत हिंसक असे वळण घेतलेले आहे. आत्तापर्यंत 300 पेक्षा जास्त लोकांचा या आंदोलनात मृत्यू देखील झालेला आहे.