‘या’ एका बेटावरुन अमेरिकेने बांगलादेशमध्ये हिंसाचार घडवला; शेख हसीना यांच्या आरोपाने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांग्लादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून अराजकता माजली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊनही हिंसाचार, जाळपोळीच्या घटना बांग्लादेशात सुरूच आहेत. वरवर जरी हा विषय आरक्षणाचा वाटत असला तरी यामध्ये कोणत्या तरी परीकय शक्तीचा हात असावा, त्याशिवाय इतकं मोठं आंदोलन पेटणार नाही असा अंदाज लावला जात असतानाच आता शेख हसीना यांच्या एका आरोपाने खळबळ उडाली आहे. बांग्लादेशच्या ताब्यात असलेल्या सेंट मार्टिन द्वीप या एका बेतासाठी हे सर्व षडयंत्र रचण्यात आल्याचे त्यांनी म्हंटल आहे. इकोनॉमिक टाईम्समधील वृत्तानुसार, त्यांनी अत्यंत निकटवर्तीयांकडून हा संदेश पाठवला आहे. त्यात बांगलादेश मधील सर्वग परिस्थितीला अमेरिका जबाबदार असल्याचे म्हंटल आहे.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Shaikh Hasina) यांनी आपल्या जवळच्या सहाय्यकांद्वारे पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे की, “मला मृतदेहांच्या रांगा पाहायच्या नव्हत्या म्हणून मी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. मी जर देशात राहिले असते तर अधिक जणांचे बळी गेले असते. सार्वजनिक मालमत्तांचे अधिक नुकसान झाले असते. अत्यंत कठीण प्रसंगात मी देश सोडण्याचा निर्णय घेतला. पण तुम्ही मला निवडलं म्हणून मी तुमची नेता झाली. जनता हीच माझी ताकद आहे. आवामी लीगच्या अनेक नेत्यांची हत्या करण्यात आल्याचे वृत्त ऐकून माझे काळीज पिळवटून निघाले आहे. मी माझ्या देशातील जनतेला विनंती करते कि कृपया कट्टरपंथीयांच्या दिशाभूलीला बळी पडू नका. मी बांगलादेशातील तरुण विद्यार्थ्यांना पुन्हा सांगू इच्छिते. मी तुम्हाला कधीच रझाकार म्हटले नाही.

जर मी अमेरिकेला सेंट मार्टिन बेट देऊन बंगालच्या उपसागरावर कब्जा करण्याची परवानगी दिली असती तर मी सत्तेत राहू शकली असती. अल्लाहच्या कृपेने मी लवकरच परत येईन. बांगलादेशच्या भविष्यासाठी मी प्रार्थना करेन. हे ते राष्ट्र आहे ज्यासाठी माझे वडील लढले. ज्यासाठी माझ्या वडिलांनी आणि कुटुंबाने आपल्या प्राणांची आहुती दिली आहे अशा भावना शेख हसीना यांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, शेख हसीना यांनी या वर्षी एप्रिलमध्ये संसदेत सांगितले होते की अमेरिका बांगलादेशातील सत्ताबदल करण्याच्या धोरणावर काम करत आहे. अमेरिका बांग्लादेश मध्ये लोकशाही नष्ट करण्याचा आणि लोकशाही अस्तित्वात नसलेले सरकार आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. चीनविरोधात भक्कम लष्करी तळासाठी अमेरिकेला बांगलादेशच्या ताब्यातील Saint Martin Island बेट गरजेचे आहे. शेख हसीना सरकारवर त्यासाठी दबाव असल्याचा दावा त्यांनी केला. 15 डिसेंबर 2023 रोजी रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने शेख हसीना पुन्हा सत्तेत आल्यास अमेरिका ते सरकार उलथून टाकणार असल्याचा दावा केला होता.