Bangladesh Violence : बांगलादेशमध्ये अवामी लीगच्या 20 हून अधिक नेत्यांची हत्या; दंगलखोरांचा धुडगूस सुरूच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांगलादेशातील हिंसाचार (Bangladesh Violence) अजूनही सुरूच आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतरही दंगलखोरांचा धुडगूस सुरूच आहे. हिंसाचार करणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांकांना लक्ष्य केलं जात आहे. तसेच सत्ताधारी नेत्यांविरोधात रान उठवलं जातंय. धक्कादायक बाब म्हणजे शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या 20 हून अधिक नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. तसेच अवामी लीगच्या नेत्यांच्या घराची तोडफोड आणि लूटमार सुद्धा करण्यात आली आहे. एकूणच बांगलादेश मधील एकूण परिस्थिती अतिशय भीषण बनली आहे.

मोहम्मद शाह आलम यांच्या घराला आग– Bangladesh Violence

अवामी लीगच्या अनेक नेत्यांच्या घरांवर आणि उद्योग धंद्यांवर हल्ले केले जात नेत्यांमध्ये पळापळ सुरु झाली आहे. दोन मंत्र्यांना विमानतळावरून देश सोडण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेण्यात आले आहे. काही नेते रविवारी रात्रीच पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. तर जे अडकलेत त्यांना लक्ष्य केलं जात आहे. अशोकतळा येथील माजी नगरसेवक मोहम्मद शाह आलम यांच्या तीन मजली घराला अज्ञातांनी आग लावल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. संतप्त जमावाने या भागातील शाह आलम यांच्या तीन मजली घरावर हल्ला केला होता. आंदोलकांनी घराच्या तळमजल्यावर आग लावली. आगीच्या धुरामुळे त्याठिकाणी असलेल्या लोकांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झाले आहेत.

बांगलादेशचा प्रसिद्ध अभिनेता शांतो खान आणि त्याच्या वडिलांना जमावाने बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली आहे. तसेच प्रसिद्ध गायक राहुल आनंद यांचे ढाक्यातील धानमंडी भागातील १४० वर्षे जुने घर दंगेखोरांनी जाळले आहे. जाळण्यापूर्वी या घरात लुटालुट करण्यात आली आहे. खासदार शफीकुल इस्लाम शिमुल यांच्या घराला संतप्त जमावाने आग लावली. आत्तापर्यंत अवामी लीगच्या 20 हून अधिक नेत्यांची हत्या करण्यात आल्याने बांग्लादेशात मोठी खळबळ (Bangladesh Violence) उडाली आहे. दरम्यान, शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर दंगलखोरांनी पोलिस स्टेशन आणि इमारती लुटल्या. ढाक्याचे मीरपूर मॉडेल पोलीस स्टेशनही संतप्त जमावाने पेटवून दिले.