हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bank Collapse Rule) महिन्याला येणारा पगार किंवा इतर कामातून येणारे पैसे जमा करण्यासाठी लोक एखाद्या बँकेत आपल्या नावाचे अकाउंट उघडतात. या अकाउंटमध्ये शक्य तशी सेव्हिंग करत जातात. जेव्हापासून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने जनधन योजना सुरू केली आहे तेव्हापासून अनेक लोकांनी बँकेत अकाउंट सुरु केले आहेत. त्यामुळे आत्ताच्या घडीला प्रत्येक व्यक्तीचे किमान एक तरी बँक खाते आहे. शिवाय आजकाल गुंतवणुकीकडे देखील कल वाढू लागला आहे. ज्यामुळे बचत खाते, मुदत ठेवी आवर्ती ठेव शिवाय वेगवेगळ्या योजनांमध्ये लोक गुंतवणूक करत आहेत.
दरम्यान, बरीच लोक एकाच बँकेत पण वेगवेगळ्या शाखांमध्ये खाती उघडून बसली आहेत. म्हणजे बँक १ पण खाती २. फरक इतकाच की दुसऱ्या खात्यासाठी दुसरी शाखा. (Bank Collapse Rule) जर तुम्हीही तुमच्या बँकेत एकापेक्षा जास्त खाती तयार केली असतील तर आजची बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण अशा परिस्थितीत, तुमच्यासारख्या एका बँकेत २ अकाउंट असणाऱ्या ग्राहकांना मोठे नुकसान झेलावे लागू शकते. ते काय? तर समजा एखाद्या कारणामुळे तुमची बँक दिवाळखोर झाली तर तुमच्या अकाउंट्समध्ये जमा केलेल्या रकमेचे काय होईल? आलं ना टेन्शन? म्हणूनच ही माहिती सविस्तर वाचा.
बँक बुडाली तर …
सामान्यपणे बँकेच्या नियमानुसार एका बँक खात्यात सर्वसाधारणपणे ५ लाख रुपयांपेक्षा जास्त बचत ठेवू नये. जर तुमच्या खात्यात जमा ५ लाख रुपये आणि ३ लाख रुपयांची एफडी (मुदत ठेव) केली असेल आणि तुमची बँक बुडाली तर ग्राहकांना केवळ ५ लाख रुपयांचा परतावा मिळेल. म्हणजेच यामध्ये तुमच्या ३ लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते.
काय सांगतो ‘ठेव विमा प्रणाली’चा नियम? (Bank Collapse Rule)
या परिस्थितीबाबत ठेव विमा प्रणालीचा नियम सांगतो की, समजा तुमची बँक बुडाली तर तुमच्या खात्यातील एकूण ५ लाख रुपये हे सुरक्षित आहेत असे मानले जाते. भारतात ठेव विमा संरक्षण १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आल आहे. त्यामुळे तुमची बँक कोणतीही असली, त्यात तुम्ही कितीही ठेव केली असाल तरीही तुम्हाला केवळ ५ लाख रुपयेच दिले जातील. (Bank Collapse Rule) समजा तुम्ही एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये ५ लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली असेल. तर तुम्हाला अधिक परताव्याची आस असू शकते. असे असले तरीही तुम्हाला केवळ आणि केवळ ५ लाख रुपयांवरच क्लेम करता येईल.
क्लेम केल्यास मिळेल ‘इतका’ परतावा
RBI च्या नियमानुसार, कोणत्याही बँकेतील एकापेक्षा अधिक खात्यांवर केवळ ५ लाख रुपयांची हमी दिली जाते. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या बँकेत ५ लाखांची एफडी केली असेल आणि त्यासोबत तुमच्या बचत खात्यात देखील ३ लाख रुपये ठेवले असतील तर ३ लाख रुपयांची हमी बँक देत नाही. अशावेळी जर बँक बुडाली तर ग्राहकाला केवळ ५ लाख रुपये परत केले जातील.
(Bank Collapse Rule) म्हणजेच काय तर बँक बुडाल्यास तुम्ही तुमच्या खात्यात ५ लाखाहून अधिक पैसे ठेवले असले तरीही वरील रक्कम तुम्हाला परत केली जात नाही. तुमच्या खात्यात कितीही पैसे असले तरी फक्त ५ लाख रुपयेच सुरक्षित मानले जातात आणि तेव्हढेच तुम्हाला परत केले जातात. महत्वाचे असे की, बँक बुडाल्यास तुम्हाला तुमच्या अकाउंटमधील रकमेवर क्लेम करावा लागतो. त्यानंतर पुढील ९० दिवसांच्या कालावधीत तुम्हाला पैसे परत मिळतात.
‘अशी’ राहील तुमची ठेव सुरक्षित
एका वृत्तानुसार, गेल्या ५० वर्षांत आपल्या भारतातील एखादीच बँक क्वचित दिवाळखोर झाल्याचे समोर आले असेल. त्यामुळे या दृष्टीने पाहिले असता भारतात तुमचा पैसे बऱ्यापैकी सुरक्षित आहे. मात्र तुमची ठेव सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला तुमची कष्टाची कमाई वेगवेगळ्या बँकांमध्ये जमा करून जोखीम कमी करता येईल. (Bank Collapse Rule) कारण वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे ठेवल्याने तुमच्या बचतीवर एकाचवेळी कोणताही परिणाम होण्याची शक्यता कमी होते.