बँक कर्मचाऱ्यांना खुशखबर ? अर्थसंकल्पानंतर आठवड्यात 2 सुट्ट्या मिळणार ?

0
1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे कर्मचारी बँकेत काम करत आहेत , त्यांनी काही महिन्यापूर्वी आम्हाला आठवड्यातून दोन सुट्या पाहिजेत अशी मागणी केली होती. आता पुन्हा एकदा या चर्चा होताना दिसत आहेत. या चर्चमध्ये अनेक प्रश्न उपस्थित झालेत. कारण देशाचा अर्थसंकल्प फेब्रुवारीमध्ये मांडला जाणार असून , यामध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे आता देशातील बँक कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळा आणि सुट्ट्या बदलणार का ? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. पण येत्या काही दिवसातच यावर निर्णय होणार आहे . तर चला जाणून घेऊयात याबद्दल अधिक माहिती .

आठवड्यातून दोन सुट्ट्या –

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या निकषानुसार कामकाज सुरू झाल्यास बँकांना प्रत्येक आठवड्यात शनिवार आणि रविवार सुट्टी मिळणार आहे. त्याऐवजी कर्मचाऱ्यांना प्रत्येक दिवशी 40 मिनिटे अधिक काम करावे लागणार आहे. सध्याच्या व्यवस्थेनुसार, देशातील बँका प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी कार्यरत राहतात, तर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांची सुट्टी असते.

कर्मचारी संघटनाची या मुद्द्यावर चर्चा –

कर्मचारी संघटना आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्यात या मुद्द्यावर अनेकदा चर्चा झाली आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार यावर कोणता निर्णय घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अंतिम निर्णय अर्थसंकल्पानंतर –

आर्थिक विश्लेषकांच्या मते, अर्थसंकल्पानंतर बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा कार्यालयीन आठवडा लागू होऊ शकतो, ज्यामुळे बँक कर्मचारी संघटनांनी सातत्यानं मागणी केलेल्या 8 सुट्ट्यांचा मुद्दा देखील साकार होण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर बँक कर्मचारी प्रत्येक दिवशी 40 मिनिटे जास्त काम करतील, ज्यामुळे बँकांची प्रारंभ वेळ 9:45 वाजता होईल, सध्या बँकांची सुरुवात 10 वाजता होते. तसेच, बँकांची कामकाजाची वेळ सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वाढवली जाऊ शकते. या बदलांची प्रक्रिया सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्या विचारावर अवलंबून असून, यावर अंतिम निर्णय अर्थसंकल्पानंतर घेतला जाईल.