Bank Holiday : डिसेंबर महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद, बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holiday : आजपासून डिसेंबर महिन्याला सुरूवात झाली आहे. या महिन्यात बँकांना एकूण 13 दिवस सुट्टी असणार आहे. डिसेंबर महिन्यात चार रविवार असल्याने या दिवशी बँकेला साप्ताहिक सुट्टी असेल. तसेच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीही बँका बंद राहतील. याशिवाय काही सण आणि विशेष दिवसांमुळे बँकांमध्ये कामकाज केले जाणार नाही. त्यामुळे जर या महिन्यात आपण बँकेमध्ये जाणार असाल तर त्याआधी बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट तपासा. Bank Holiday

Bank Holidays : अगले महीने 13 दिन बैंक रहेंगे बंद, ब्रांच जाने से पहले देख लें छुट्टियों की पूरी लिस्‍ट - bank holidays bank holiday latest update bank holiday december 2022 bank

हे लक्षात घ्या कि, RBI कडून प्रत्येक कॅलेंडर वर्षासाठी बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट तयार केली जाते. मात्र डिसेंबरमध्ये संपूर्ण देशातील बँका एकत्रितपणे 13 दिवस बंद राहणार नाहीत. RBI ने सुट्ट्यांची जी लिस्ट जारी केली आहे, त्यातील अनेक सुट्ट्या या राष्ट्रीय पातळीवरील आहेत, तर काही सुट्ट्या स्थानिक किंवा प्रादेशिक स्तरावरील आहेत. त्यामुळे त्या दिवशी संबंधित राज्यांमध्येच बँकांच्या शाखा बंद राहतील. Bank Holiday

Holiday List: Banks To Remain Closed On These Days Next Week | Check Full List Here | India.com

ऑनलाइन सेवा सुरूच राहणार

सध्या बहुतेक बँकांकडून ऑनलाईन सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळेच आता बँका बंद असतानाही पैसे ट्रान्सफर करण्यासहीत अनेक गोष्टी करता येतात. मात्र, अजूनही अशी काही कामे आहेत ज्यासाठी आपल्याला बँकेच्या शाखेत जावे लागते. म्हणूनच ग्राहकाने बँकांच्या सुट्ट्यांची माहिती घेत राहावी जेणेकरुन बँकिंगचे कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर ते सुट्टीच्या आधी करता येतील. Bank Holiday

Bank holidays in December 2022: Banks closed for almost 12 days in various states, cities in Dec; Check list | The Financial Express

बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट तपासा (Bank Holiday)

3 डिसेंबर : (शनिवार) : सेंट झेवियर्स फेस्ट- गोव्यात बँक बंद.
4 डिसेंबर (रविवार): देशभरात सुट्टी.
10 डिसेंबर (शनिवार): दुसरा शनिवार – देशभरातील बँका बंद राहतील.
11 डिसेंबर (रविवार): देशभरात सुट्टी आहे.
12 डिसेंबर (सोमवार): मेघालयमध्ये पा-तागन नेंगमिंजा संगम – बँक बंद.
18 डिसेंबर (रविवार): देशभरात सुट्टी आहे.
19 डिसेंबर (सोमवार): गोवा मुक्ती दिन- गोव्यामध्ये बँका बंद.
24 डिसेंबर (शनिवार): चौथा शनिवार- देशभरातील बँका बंद.
25 डिसेंबर (रविवार): देशभरात सुट्टी आहे.
26 डिसेंबर (सोमवार): नाताळमध्ये बँक बंद, लासुंग, नामसंग- मिझोराम, सिक्कीम, मेघालय.
29 डिसेंबर (गुरुवार): गुरु गोविंद सिंग यांच्या जयंती- चंदीगडमध्ये बँका बंद राहणार आहेत.
30 डिसेंबर (शुक्रवार): U Kiang Nangwah – मेघालयातील बँका बंद.
31 डिसेंबर (शनिवार): मिझोरममध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बँका बंद.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx

हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा