फेब्रुवारीमध्ये तब्बल 8 दिवस बंद राहणार बँका!! जाणून घ्या कोणत्या दिवशी असणार आहे सुट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवीन वर्षाचा जानेवारी हा महिना संपत आला आहे. काही दिवसांनी फेब्रुवारी सुरू होईल. आता कुठे लॉकडाऊननंतर जनजीवन रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे वेळोवेळी बँकेची पायरी चढण्याची गरज लागू शकते. फेब्रुवारीमध्ये बँकेला बऱ्याच सुट्ट्या असणार आहेत. यामुळे या सुट्ट्यांविषयी माहिती घेणे महत्त्वाचे आहे. जाणून घेऊ कोणत्या दिवशी बँका बंद असतील याबाबत.

रिझर्व बँक ऑफ इंडियाने वर्षभराच्या बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. बँकांना वर्षभरामध्ये 40 पेक्षा जास्त सुट्ट्या असणार आहेत. शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये खालीलप्रमाणे सुट्ट्या असणार आहेत.

12 फेब्रुवारी (शुक्रवार- सोनम लोसार- सिक्किम), 13 फेब्रुवारी (दूसरा शनिवार), 15 फेब्रुवारी (सोमवार- मणिपुर), 16 फेब्रुवारी (मंगळवार- वसंत पंचमी), 19 फेब्रुवारी (शुक्रवार- छत्रपति शिवाजी महाराज जयंती – महाराष्ट्र), 20 फेब्रुवारी (शनिवार- अरुणाचल आणि मिजोरम), 26 फेब्रुवारी (शुक्रवार- हजरत अली जयंती – उत्तर प्रदेश), 27 फेब्रुवारी (चौथा शनिवार, गुरू रविदास जयंती- चंडीगड, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि पंजाब) या दिवशी सुट्टी असणार आहे.

वरील सुट्ट्या लक्षात ठेवून ग्राहकांनी आपल्या गरजेचे आणि महत्वाचे बँकेचे काम उरकून घ्यावीत. कामाच्या दिवशी सुट्टी असल्यास सुट्टीच्या दिवशी इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग पर्यायानुसार बँकेची कामे करता येऊ शकतात. इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिगमधून अचानक आलेल्या सुट्टीच्या अडचणीतून आपण मार्ग काढू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment