Bank Holiday : मार्चमध्ये 12 दिवस बँका राहणार बंद, घर सोडण्यापूर्वी तपासा सुट्ट्यांची लिस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holiday : आता लवकरच मार्च महिना सुरु होतो आहे. आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने बँकिंग क्षेत्रासाठी हा महिना खास मानला जातो. दरवर्षी मार्च महिन्यात बँकिंग कामकाजावर जास्त ताण येतो. याबरोबरच दरवर्षी होळी बरोबरच काही सणही याच महिन्यात येतात. ज्यामुळे बँकिंग क्षेत्रावर मार्च महिन्यामध्ये सुट्ट्यांचा आणखी ताण येतो.

Bank Holiday In June 2022 bank will be closed for 12 days check holiday  list here | Bank Holiday In June 2022: बैंक जानें से पहले छुट्टियों की  लिस्ट को करलें याद,

यंदाच्या वर्षीही परिस्थिती काही वेगळी असणार नाही. कारण मार्च महिन्यात एकूण 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जर आपले एखादे महत्त्वाचे काम अडकले असेल तर फारसा उशीर न करता ते आत्ताच पूर्ण करा, अन्यथा नंतर काही अडचणींचा सामना करावा लागू शकेल. Bank Holiday

RBI च्या सुट्ट्यांच्या लिस्टनुसार, मार्च महिन्यात होळीमुळे अनेक दिवस बँकांमध्ये कामकाज बंद राहणार आहे. तसेच पुढील महिन्याच्या 12 सुट्ट्यांमध्ये काही सुट्ट्या या स्थानिक पातळीवरील असतील, तर काही सुट्ट्यांच्या दिवशी देशभरातील बँका बंद राहतील. यामुळे बँकेत जाण्याआधी बँकेच्या सुट्ट्यांची लिस्ट तपासणे महत्वाचे ठरेल. Bank Holiday

April Bank Holiday: Bank Holidays In April: 2 Long Weekends, 9 Holidays  Could See Bank Branches Remaining Closed For 15 Days In April

मार्च महिन्यातील सुट्ट्यांची लिस्ट तपासा (Bank Holiday)

03 मार्च : छपचार कुट.
05 मार्च : रविवार.
07 मार्च: होळी / होलिका दहन / धुलेंडी / डोल जत्रा
08 मार्च: धुलेती/डोल जत्रा/होळी/यासंग
09 मार्च : होळी
11 मार्च: दुसरा शनिवार
12 मार्च: रविवार
19 मार्च : रविवार
22 मार्च: गुढी पाडवा / उगादी / बिहार दिवस / साजिबू नोंगमापनबा / पहिली नवरात्री / तेलुगु नवीन वर्ष
25 मार्च: चौथा शनिवार
26 मार्च : रविवार
30 मार्च: राम नवमी

Bank Holidays : अगले महीने 13 दिन बैंक रहेंगे बंद, ब्रांच जाने से पहले देख  लें छुट्टियों की पूरी लिस्‍ट - bank holidays bank holiday latest update bank  holiday december 2022 bank

इथे हे जाणून घ्या कि, सुट्ट्यांच्या दिवशी बँकांच्या शाखा बंद असल्या तरीही अनेक बँकिंगची कामे डिजिटल पद्धतीने करता येतील. UPI, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग यांसारख्या डिजिटल सेवांवर या सुट्ट्यांच्या कोणताही परिणाम होणार नाही. तसेच या दरम्यान एटीएममधून पैसे काढतानाही ग्राहकांना कोणतीही अडचण भासयेणार नाही. Bank Holiday

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx

हे पण वाचा :
Multibagger Stock : देशातील सर्वात मोठ्या ग्रुपच्या ‘या’ शेअर्सनी एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट
Gold Price Today : सोने-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आपल्या शहरातील आजचे नवीन दर
Bank FD : देशातील ‘या’ बँकानी देखील FD वरील व्याजदरात केली वाढ, तपासा नवीन दर
Railway : रेल्वे स्थानकांवर आता अवघ्या काही मिनिटांत मिळणार तिकीट, रेल्वेने सुरू केली नवीन सुविधा
Airtel च्या ‘या’ प्लॅनअंतर्गत एका रिचार्जमध्ये चालणार 4 मोबाईल, यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटाही उपलब्ध