Bank Holidays : पुढील 5 दिवस ‘या’ शहरांमध्ये बँका बंद राहणार, बँकेत जाण्यापूर्वी लिस्ट तपासा

Bank Holiday
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या बँक हॉलिडेज (Bank Holidays) कॅलेंडरनुसार, सप्टेंबर महिन्यात बँकांना एकूण 12 सुट्ट्या आहेत, मात्र जर तुम्हांला येत्या 5 दिवसात बँकेशी संबंधित कोणतेही काम निकाली काढायचे असेल तर त्यापूर्वी तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे कि तुमच्या शहरातील बँकांमध्ये काम होईल की नाही. अनेक सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे या आठवड्यात बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. त्यामुळे या सुट्ट्यांची लिस्ट पाहूनच तुम्ही तुमच्या कामाचे नियोजन करा.

रिझर्व्ह बँक दर महिन्याला सुट्ट्यांची लिस्ट जारी करते. या महिन्यात एकूण 12 सुट्ट्या होत्या, त्यापैकी 5 सप्टेंबरची सुट्टी गेली आहे.

8 सप्टेंबर 2021 रोजी बँकेला सुट्टी
8 सप्टेंबर 2021 – श्रीमंत शंकरदेव तिथी
या सणामुळे गुवाहाटीच्या बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.

9 सप्टेंबर 2021 रोजी बँकेला सुट्टी
9 सप्टेंबर 2021 – तीज हरितालिका
हरितलिका तीज आणि इंद्रजत्रामुळे गंगटोक बँका 9 आणि 10 सप्टेंबर रोजी काम करणार नाहीत.

10 सप्टेंबर 2021 रोजी बँकेला सुट्टी
10 सप्टेंबर 2021 – गणेश चतुर्थी/संवत्सरी (चतुर्थी पक्ष)/विनायक चतुर्थी/वरसिद्धी विनायक व्रत
गणेश चतुर्थीमुळे बँका 10 सप्टेंबर रोजी काम करणार नाहीत. या दिवशी अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, नागपूर आणि पणजी येथील बँका बंद राहतील.

11 सप्टेंबर 2021 रोजी बँकेला सुट्टी
11 सप्टेंबर 2021 – महिन्याचा दुसरा शनिवार / गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस (पणजी)
11 सप्टेंबर हा महिन्याचा दुसरा शनिवार आहे, याशिवाय पणजीतील गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशीही बँका बंद राहतील.

12 सप्टेंबर 2021 रोजी बँकेला सुट्टी
12 सप्टेंबर रोजी रविवार असल्यामुळे सर्व राज्यांच्या बँका बंद राहतील.