Bank Holidays In August। बँक हा आपल्या जीवनातील महत्वाचा भाग आहे. आजकाल एकमेकांना पैसे पाठवणं मोबाईलच्या माध्यमातून सोप्प झालं असलं तरी इतर कामांसाठी आपल्याला बँकांच्या पायऱ्या झिजवाव्याच लागतात. त्यामुळे बँकेत जात असताना कोणत्या दिवशी बँक बंद आहे आणि कधी सुरु आहेत ते माहिती असं आवश्यक आहे. सध्या सुरु असलेला जुलै महिना २ दिवसात संपेल आणि नवीन महिना ऑगस्ट सुरु होईल. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात तुमची बँकेत काही कामे असतील तर सुट्ट्यांची यादी पाहूनच सदर कामांचे नियोजन करा. ऑगस्ट महिन्यात कोणत्या तारखेला बँका बंद आहेत आणि एकूण किती दिवस बँकांना सुट्टी आहे हे आम्ही तुम्हाला सविस्तर सांगतो.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आपल्या वेबसाइटवर प्रत्येक महिन्याच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, विविध कारणांमुळे ऑगस्टमध्ये 14 दिवस बँका बंद (Bank Holidays In August) राहतील. ऑगस्टमध्ये रक्षाबंधन आणि जन्माष्टमीसारखे मोठे सण येत आहेत. याशिवाय 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनही साजरा केला जाणार आहे. तसेच शनिवार आणि रविवार पकडून एकूण 14 दिवस बँकांना सुट्टी असेल. त्यामुळे तुमची काही कामे असतील तर सुट्ट्यांची यादी पाहूनच बँकेत जा, यामुळे तुमचा वेळ वाया जाणार नाही अन्यथा तुमचा हेलपाटा होऊ शकतो.
कोणकोणत्या दिवशी बँकांना सुट्ट्या – Bank Holidays In August
३ ऑगस्ट – केर पूजा – आगरतळा येथे सुट्टी.
4 ऑगस्ट – रविवार – देशभरात सुट्टी
7 ऑगस्ट – हरियाली तीज – हरियाणात सुट्टी
8 ऑगस्ट – तेंडोंग ल्हो रम फाट – गंगटोकमध्ये सुट्टी.
10 ऑगस्ट – दुसरा शनिवार – देशभरात सुट्टी
11 ऑगस्ट – रविवार – देशभरात सुट्टी
13 ऑगस्ट – देशभक्त दिवस – इंफाळमध्ये सुट्टी.
१५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन – देशभरात सुट्टी
18 ऑगस्ट – रविवार – देशभरात सुट्टी
19 ऑगस्ट – रक्षाबंधन – अहमदाबाद, जयपूर, कानपूर, लखनऊसह अनेक ठिकाणी सुट्टी असेल.
20 ऑगस्ट – श्री नारायण गुरु जयंती – कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये सुट्टी
24 ऑगस्ट – चौथा शनिवार – देशभरात सुट्टी
25 ऑगस्ट – रविवार – संपूर्ण देशात सुट्टी असेल.
26 ऑगस्ट – जन्माष्टमी – देशभरात सुट्टी
बँकांना सुट्टी असली तरी तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकता. याशिवाय तुम्ही UPI, नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून एकमेकांना पैसे पाठवू शकता किंवा घेऊ शकता. या सर्व सेवा २४ तास उपलब्ध असतात .