हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सप्टेंबर महिन्यात तुमचे कुठले बँकेचे (Bank)महत्वाचे काम बाकी असेल तर आत्ताच करून घ्या. कारण पुढील महिन्यात बँकेला तब्बल 16 दिवस सुट्ट्या जाहीर (Bank Holidays In October 2023) करण्यात आल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात बँकेला असलेल्या एवढ्या अधिक सुट्ट्या बघता तुमचे कुठलेही महत्वाचे काम तुम्ही जर ऑक्टोबर महिन्यात करण्याचा विचार करत असाल तर ते अडकून राहू शकते आणि तुम्हाला तुमचे काम पुर्ण करून घेण्यास गरजेपेक्षा अधिकचा वेळ लागू शकतो .
सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु होताच Reserve bank of India ( RBI ) ने पुढील महिन्यात बँकेला असलेल्या सुट्टीची यादी जाहीर केली आहे. RBI ने जाहीर केलेल्या यादी नुसार देशभरातील बँकांना एकूण 16 दिवस सुट्ट्या असतील .देशातील काही भागात विशेष दिवसाच्या सुट्ट्या दिल्या जातात त्याअंतर्गत या सुट्टयाची यादी वाढली असून काही सुट्टया ह्या देशातील ठराविक भागातच बँकेला दिल्या जातील.
पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर मध्ये देशात सणासुदीची मोठी लगबग आहे. तसेच नवरात्री व दसरा असे मोठे सण देशात साजरे केले जातील. त्यासाठी बँकेला सुट्टया दिल्या जातील तसेच देशात गांधी जयंती देखील मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते त्यासाठी देखील बँकेचे कामकाज बंद असेल. त्यामुळे तुमचे बँकेचे कुठलेही महत्वाचे काम असेल तर लवकरात लवकर ह्याच महिन्यात पुर्ण करून घ्या. नाहीतर पुढल्या महिन्यात तुमची अडचण होऊ शकते .
ऑक्टोबरमध्ये बँका कधी बंद असतील ?
1 ऑक्टोबर 2023, रविवार
2 ऑक्टोबर 2023, महात्मा गांधी जयंती
8 ऑक्टोबर 2023, रविवार
14 ऑक्टोबर 2023, महालय (कोलकाता)
15 ऑक्टोबर 2023, रविवार
18 ऑक्टोबर 2023, काटी बिहू (गुवाहाटी)
21 ऑक्टोबर 2023, दुर्गा पूजा सप्तमी (अगरताळा, गुवाहाटी, इंफाळ, कोलकाता)
22 ऑक्टोबर 2023, रविवार
23 ऑक्टोबर 2023, दुर्गा पूजा नवमी (अगरताळा, बंगलोर, भुवनेश्वर, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, कानपूर, कोची, कोहिमा, कोलकाता, लखनौ, पाटणा, रांची, शिलाँग, तिरुवनंतपुरम)
24 ऑक्टोबर 2023, दुर्गा पूजा
25 ऑक्टोबर 2023, दुर्गा पूजा (गंगटोक)
26 ऑक्टोबर 2023, दुर्गा पूजा (दसैन) (गंगटोक, जम्मू, श्रीनगर)
27 ऑक्टोबर 2023, दुर्गा पूजा (दसैन) (गंगटोक)
28 ऑक्टोबर 2023, लक्ष्मी पूजन (कोलकाता)
29 ऑक्टोबर 2023, रविवार
31 ऑक्टोबर 2023, सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस (अहमदाबाद)