हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जुलै महिन्यामध्ये बँकांना 15 दिवस सुट्ट्या दिल्या जाणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये काही सार्वजनिक सुट्ट्या तर बँकेच्या नियमानुसार शनिवार रविवार सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे एकीकडे ग्राहकांचे नुकसान असून बँक कर्मचाऱ्यांचे मात्र बल्ले बल्ले आहेत. अर्धा जुलै महिना सुट्ट्यांमध्ये जाणार असल्याने जर तुमचे बँकेत काही पेंडिंग कामे असतील तर ती लवकरात लवकर उरकण्याचा प्रयत्न करा.
भारतीय रिझर्व बँकेने जुलै महिना मध्ये सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आणि बँकेच्या नियमाप्रमाणे रविवारी बँक बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे जुलै महिन्यामध्ये शनिवार रविवार धरून 7 सुट्ट्या येत आहेत, या महिन्यामध्ये 5 रविवार आणि 2 शनिवारी सुट्टी असणार आहे. तर 5 जुलैला हरगोविंद सिंग जन्मदिनानिमित्त सुट्टी देण्यात आली आहे. पाच तारखेला महिन्याची पहिली सुट्टी असून 29 जुलैला महिन्याची शेवटची सुट्टी असणार आहे.
पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी
2 जुलै रविवार
5 जुलै रोजी गुरु हरगोविंद सिंह जयंती (जम्मू, श्रीनगर ),
6 जुलै एमएचआयपी दिवस (मिझोरम),
8 जुलै दुसरा शनिवार, नऊ जुलै रविवार,
11 जुलै केर पूजा (त्रिपुरा),
13 जुलै भानू जयंती (सिक्कीम) ,
16 जुलै रविवार,
17 जुलै यु तिरोट सिंग डे (मेघालय) ,
21 जुलै द्रुक्पा त्शे – ज़ी (गँगटोक),
22 जुलै चौथा शनिवार, 23 जुलै रविवार,
29 जुलै मोहरम ( सर्व राज्यात )
30 जुलै रविवार,
31 जुलै शहादत दिवस ( हरियाणा आणि पंजाब )
दरम्यान, मे महिन्यामध्ये आरबीआय ने 2000 च्या नोटा चलनातून काढण्याचा आदेश दिला होता. त्याचबरोबर 30 सप्टेंबर पर्यंत 2000 च्या नोटा जमा करा असं आवाहन बँकांकडून करण्यात आलं होते. त्यामुळे तुम्हाला जर जुलैमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करायच्या असेल तर बँक हॉलिडे नुसार नियोजन करून तुम्ही बँकांमध्ये 2000 च्या नोटा जमा करू शकतात.