हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| या 1 मार्चपासून देशातील अनेक मोठ्या बँकांनी मुदत ठेवीवरील (FD) व्याजदरात वाढ किंवा घट केली आहे. या बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक अशा विविध बँकांचा समावेश आहे. आता या बँका सध्याच्या घडीला व्याजदर देत आहेत आपण जाणून घेऊया. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही बँकेत जाण्यापूर्वी त्या बँकेचे व्याजदर अगोदरच माहीत असेल. ज्याने तुमचा वेळ देखील वाचेल.
युनियन बँक ऑफ इंडिया
जानेवारी 2024 पासून ही बँक दोन कोटी पेक्षा कमी रकमेवर 3.5 टक्के ते 7.25 टक्के दराने व्याज देत आहे या बँकेचे नवे दर 19 जानेवारीपासून लागू करण्यात आले आहेत.
कर्नाटक बँक
ग्राहकांना कर्नाटक बँकेकडून दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर 3.5 ते 7.25 टक्के परतावा देण्यात येत आहे. या बँकेचे नवीन दर 20 जानेवारीपासून लागू झाले आहेत.
फेडरल बँक
फेडरल बँक 7 दिवस ते 5 वर्षे आणि त्याहून अधिक कालावधीच्या मुदत ठेवींवर सामान्य नागरिकांसाठी 3 टक्के ते 7.75 टक्के व्याजदर देत आहे. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक 3.50 ते 8.25 टक्के व्याजदर देत आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, हे दर 17 जानेवारीपासून आहेत.
पंजाब नॅशनल बँक
नव्या वर्षापासून पंजाब बँक सामान्य ग्राहकांना ठेवींवर 3.5 टक्के ते 7.25 टक्के देत आहे. तसेच या महिन्यापासून बँकेने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदरात देखील मोठे बदल केले आहेत.
कोटक महिंद्रा बँक
गेल्या चार जानेवारीपासून कोटक बँक ग्राहकांना 2.75 ते 7.25 टक्के पर्यंत व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 3.25 ते 7.80 व्याजदर देत आहे.
IDBI बँक
ही बँक आपल्या ग्राहकांना सात दिवस ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी 3 टक्के ते 7 टक्के रिटर्न्स देत आहे. तर जेष्ठ ग्राहकांना 3.50 टक्के ते 7.50 टक्के रिटर्न देत आहे.
बँक ऑफ बडोदा बँक
बडोदा बँकेने 15 जानेवारीपासून व्याज दरात मोठे बदल केले आहेत. त्यानूसार ही बँक 4.25 टक्क्यांवरून 7.25 टक्के देत आहे.