Bank Job| अनेक तरुणांची बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. याचं तरुणांसाठी युनियन बँकेने पदभरती जाहीर केली आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये (Union Bank Of India) अप्रेंटिस पदासाठी (Apprentice post) 2691 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या भरती अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 मार्च 2025 आहे. त्यामुळे या तारखेच्या आत तरुणांनी आपले अर्ज सादर करावेत. (Job Requirement)
पदाचे नाव आणि रिक्त जागा
या भरतीत अप्रेंटिस पदासाठी एकूण 2691 जागा उपलब्ध आहेत. या पदांवर पात्र आणि निवडक उमेदवारांना काम करण्याची संधी दिली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्जदारांनी संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असावी. पात्रतेविषयी अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा
या भरतीसाठी उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे. या वयाच्या पलीकडे अर्ज केलेल्या उमेदवारांना संधी दिली जाणार नाही.
अर्ज शुल्क
सामान्य, OBC, आणि EWS प्रवर्गासाठी: 800
SC आणि ST प्रवर्गासाठी: 600
PWBD (दिव्यांग) उमेदवारांसाठी: 400
अर्ज प्रक्रिया आणि अंतिम तारीख (Bank Job)
उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 मार्च 2025 असल्याने इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावा.
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट (Bank Job)
उमेदवारांना अधिकृत वेबसाईट www.unionbankofindia.co.in येथे जाऊन अर्ज करता येईल.(Bank Job)
दरम्यान, अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात. तसेच, अर्जाची अंतिम तारीख लक्षात घेऊन अर्ज सादर करावा आणि अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात तपासावी. या पदभरतीमुळे बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना मोठी संधी मिळणार आहे.