Bank of Baroda च्या ग्राहकांना आता FD वर मिळणार जास्त व्याज, नवीन दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda : RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढव करण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. याच दरम्यान, आता बँक ऑफ बडोदाने देखील आपल्या ग्राहकांना भेट देताना FD वरील व्याजदरात वाढ केली आहे.

BoB Customers Can Now Get Banking Transactions Details In Their Preferred Language - Goodreturns

13 सप्टेंबर 2022 पासून नवीन दर लागू

बँकेच्या अधिकृत वेबसाइट वरील माहितीनुसार, Bank of Baroda ने व्याजदरात 0.20 टक्क्यांपर्यंतची वाढ केली आहे. हे लक्षात घ्या कि, बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीसाठीच्या व्याजदरात वाढ केली ​​आहे. 13 सप्टेंबर 2022 पासून बँकेचे हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. आता बँकेकडून 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी FD वर ग्राहकांना 3 टक्के ते 5.65 टक्के व्याज मिळेल. याचबरोबर Bank of Baroda ज्येष्ठ नागरिकांना FD वर 0.50 टक्के अतिरिक्त व्याज देखील देते.

Types of fixed deposit: How to Choose the Right FD | IDFC FIRST Bank

Bank of Baroda चे एफडी दर (2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडी)-

7-14 दिवसांची FD-3.00%
15-45 दिवसांची FD-3.00%
46-90 दिवसांची FD-4.00%
91-180 दिवसांची FD – 4.00%
181-270 दिवसांची FD – 4.65%
271-1 FD 4.65% पेक्षा कमी
1 वर्ष FD-5.50%
1 ते 400 दिवसांची FD – 5.50%
400 दिवस ते 2 वर्षे – 5.50%
2 ते 3 वर्षांची FD – 5.55%
3 ते 5 वर्षांची FD – 5.65%
5 ते 10 वर्षांची FD – 5.65%

After banks increased interest rates, RBI has changed fixed deposit rules

RBI ने रेपो दरात 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.4 टक्के केला

अलीकडेच RBI ने रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.4 टक्के केला आहे. RBI ने मागील 3 पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेट रेपो 1.40 टक्क्यांनी वाढवला आहे.

अनेक बँकांकडून एफडी दरांमध्ये करण्यात आली वाढ

नुकतेच पंजाब नॅशनल बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, करुड वैश्य बँक, इंडसइंड बँक, ICICI बँक इत्यादींनी देखील त्यांच्या एफडी दरांमध्ये वाढ केली आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर दर वाढवण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहे. Bank of Baroda

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bankofbaroda.in/interest-rate-and-service-charges/deposits-interest-rates

हे पण वाचा :

‘या’ Multibagger Stock ने 5 वर्षातच गुंतवणूकदारांना दिला 28,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न

PM Kisan Maandhan Yojana : आता शेतकऱ्यांना दरमहा मिळणार 3,000 रुपये पेन्शन, कसे ते पहा

Jacqueline Fernandez च्या उत्तराने दिल्ली पोलीस नाराज, आता पुन्हा केली जाणार चौकशी

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, नवीन दर पहा

IRCTC ने रेल्वेच्या रिझर्व्हेशनसाठी सुरु केली नवीन सुविधा