हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| तुम्ही नोकरी शोधताय का? आता भारतातील एका मोठ्या बँकेत मेगा भरती सुरु झाली आहे. अर्ज करण्याची मुदत जवळ आल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आता त्वरा केली पाहिजे, लवकर अर्ज भरून आपल्या पदाची निश्चिती केली पाहिजे. भारती प्रक्रियेबाबत अधिसूचना बँक ऑफ बडोदा या देशातील महत्वाच्या बँकेने नुकतीच जारी केली आहे. नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना बँक ऑफ बडोदा या देशातील महत्वाच्या बँकेत काम करण्याची मोठी संधी मिळत असल्याने इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज भरणे गरजेचे आहे. बँक ऑफ बडोदामध्ये नेमकी कोणत्या पदासाठी संधी आहे, वाचा.
देशातील अग्रगण्य बँक ‘बँक ऑफ बडोदा’ यांच्यातर्फे नोकरीच्या शोधात असणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी ही अपूर्व संधी आहे. बँक ऑफ बडोदा यांनी ही भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भारती प्रक्रिया जशी ऑनलाईन पाहता येणार आहे, तसे ऑफलाईनही अर्ज पाठवता येणार आहेत. दि. 20 जानेवारी 2024 या आजपासून 10- 12 दिवस अर्ज प्रक्रियेसाठी राहिले असून इच्छुकांनी वेबसाईटला भेट देऊन अर्ज प्रक्रिया समजावून घ्यावी. नंतरच अर्ज पाठवावेत.
आपल्या आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून ‘बँक ऑफ बडोदा’ बलार्ड पियर, मुंबई या कार्यालयाच्या पत्यावर हे अर्ज दि, 20 जानेवारी 2024 पर्यंतच पोहोचेल अशा रीतीने पाठविले पाहिजेत. या मुदतीनंतरचे अर्ज अवैध ठरतील. इच्छुक उमेदवाराला बँकिंग क्षेत्रातील कामाचा अनुभव असणे आवश्यक असल्याची अट बँकेने ठेवली आहे. बँक ऑफ बडोदा या बँकेने पर्यवेक्षक या पदाकरीता ही भरती प्रक्रिया राबवल्याचे म्हटले आहे.
बँकेमध्ये आवश्यक पदासाठी अर्ज करताना इच्छुक उमेदवाराने किमान 3 वर्षे बँकिंग क्षेत्रात काम केले असले पाहिजे, अशी अट आहे. बँक ऑफ बडोदामध्ये अर्ज करण्यापूर्वी बँकेच्या संकेतस्थळाला इच्छुक उमेदवारांनी भेट देऊन सर्व नियम, अटी समजावून घेतल्या पाहिजेत.
अनेक बँकांमध्ये भरती प्रक्रिया नेहमीच सुरु असते. दहावी पास उमेदवारांपासून ते पदवीधर उमेदवारांपर्यंत बँक ऑफ बडोदाच्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतील. जे उमेदवार पात्र आहेत आणि ज्यांना नोकरीची प्रतीक्षा आहे, अशा उमेदवारांसाठी ही मोठी पर्वणी आहे. अर्ज भरण्याची मुदत 10 दिवसांवर असल्याने लवकरात लवकर अर्ज दिलेल्या मुदतीच्या आत आणि दिलेल्या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीने पाठवू शकता.