हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करावी आणि चांगले आयुष्य जगावे. अशी अनेक लोकांची इच्छा असते आणि त्यासाठी प्रयत्न देखील करत असतात. परंतु आता देशातील कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवरच वाईट वेळ आलेली आहे. कारण रोजगार निर्मितीचा वेग सध्या मोठ्या प्रमाणात मंदावलेला दिसत आहे. त्यामुळे आता बँक ऑफ बडोदाने (Bank Of Baroda कॉर्पोरेट क्षेत्रातील रोजगारवाढ बाबतची आकडेवारी देखील जाहीर केलेली आहे. त्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2023-24 या आर्थिक वर्षात कार्परीक्षेत्रातील रोजगार निर्मितीचा वाढीचा दर हा 4.2% ने कमी झालेला आहे. त्यामुळे जे लोक काम करतात त्यांचीच नोकरी धोक्यात आलेली आहे. त्यामुळे इतर लोकांना काम मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.
बँक ऑफ बडोदाने कॉर्पोरेट रोजगार निर्मितीबाबत आकडेवारी जाहीर केलेली आहे. त्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2021- 22 या आर्थिक वर्षानुसार 1196 कंपन्यांमध्ये तब्बल 58 लाख 27 हजार 272 कर्मचारी होते. परंतु 2022- 23 मध्ये ही संख्या 61 लाख 60 हजार 968 पर्यंत वाढली. म्हणजे या एका वर्षाच्या दरम्यान 33 हजार 696 लोकांना रोजगार मिळालेला आहे. त्यात परंतु 2023 आणि 24 आर्थिक वर्षात 1196 कंपन्यांनी फक्त 1.5. टक्के वाढीसह दुकानात रोजगार दिलेला आहे. त्यांनी केवळ 9840 नवीन लोकांना रोजगार दिलेला आहे. म्हणजेच 2023- 24 आर्थिक वर्षात एक लाखापेक्षा कमी लोकांना रोजगार दिलेला आहे.
375 कर्मचाऱ्यांमध्ये कर्मचार्यांची संख्या घट
बँक ऑफ बडोदाने सादर केलेल्या या आकडेवारीनुसार 1196 कंपन्यांमध्ये 700 अशा कंपन्या होत्या. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली होती. परंतु उरलेल्या 121 कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या संकेत कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. त्याचप्रमाणे 375 अशा कंपन्या आहे. ज्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत देखील घट केलेली आहे.
बँक ऑफ बडोदाने दिलेल्या अहवालात असे म्हटलेले आहे की, 2023-24 आर्थिक वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले आहे. यावर्षीचा जीडीपी वाढीचा दर हा 8.2% असा आहे 2021 आणि 22 या आर्थिक वर्षांमध्ये जीडीपीची वाढ ही 9.7 टक्के एवढी होती. तर 2022 आणि 23 आर्थिक वर्षात जीडीपी वाढली होती. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या जीडीपीमध्ये वाढ झालेला असला, तरी रोजगारात मात्र वाढ झालेली नाही. कारण आजकाल अनेक कंपन्यांची विक्री संख्या कमी झालेली आहे. तसेच जगभरात आर्थिक मंदी पसरण्याची भीती आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी त्यांच्या कंपन्यात असलेल्या रोजगारांची संख्या कमी केलेली आहे. तर काही कंपन्यांनी भरती प्रक्रिया कमी केलेली आहे.
कोणत्या क्षेत्रात किती रोजगार
आयटी क्षेत्रामध्ये सध्या 25% एवढा रोजगार आहे. तसेच बँकिंग क्षेत्रामध्ये 22 टक्के रोजगार उपलब्ध आहेत. किरकोळ बाजारात 19.4% रोजगार आहे. तर व्यापारामध्ये 16.2% एवढा रोजगार संधी आहे. तसेच 15.8% एवढी रोजगाराची संधी आहे.