वर्ध्यात भरदिवसा बँकेवर दरोडा; पिस्तुलचा धाक दाखवत लाखोंची रोकड, साडे ३ किलो सोने लुटले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वर्धा । वर्ध्यात भरदिवसा एका बँकेवर दरोडा पडल्याची धक्कादायक घटना आज, गुरुवारी घडली. बँकेतील कर्मचाऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखवत बँकेतील ३ लाख १८ हजार रुपयांची रोकड आणि साडेतीन किलो सोने लुटून दरोडेखोर पसार झाले. इतेच नव्हे तर बँक लुटल्यानंतर दरोडेखोरांनी बँक कर्मचाऱ्यांच्या दुचाकी घेऊन पळ काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्ध्यामध्ये ‘मुथुट फायनान्स’च्या शाखेवर आज, सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी दरोडा पडला. दरोडेखोराने बँक व्यवस्थापकांच्या कमरेला पिस्तूल लावले आणि चेंबर पेटीतून लाखोंची रोकड लंपास केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या बँक लुटीत ३ लाख १८ हजार रुपयांची रोकड आणि साडे ३ किलो सोने दरोडेखोरांनी लुटले. लुटीनंतर त्यांनी कर्मचाऱ्यांच्या दुचाकीवरून पोबारा केला.

दरोडेखोरांनी चोरी करताना मास्क घातले होते. मात्र, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून तपासाला सुरुवात झाली आहे. मुथूट फिनकॉर्पच्या कार्यालयात पोलिसांनी फिंगर प्रिंट आणि स्केच तयार करण्याचं काम सुरु केलं आहे. पोलिसांनी मुथूटच्या कर्मचाऱ्यांकडून घडेलेल्या प्रकाराची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. (Robbery at Muthoot Fincorp office at Wardha) दरम्यान, वर्धा शहरात दिवसाढवळ्या मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा पडल्याने शहरात खळबळ पसरली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.