Bank Rules Change: 1 एप्रिलपासून बँकेच्या नियमात मोठे बदल!! डिजिटल व्यवहारांवर होणार थेट परिणाम

Bank Rules Change
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bank Rules Change| मार्च महिना संपायला अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यानंतर १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल. या आर्थिक वर्षात देशभरात बँकिंग क्षेत्रात मोठे बदल (Bank Rules) होणार आहेत. रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) मंजूर केलेल्या नव्या नियमांमुळे ATM व्यवहार, सेव्हिंग अकाउंटवरील व्याजदर, डिजिटल बँकिंग आणि मिनिमम बॅलेन्सशी संबंधित अटींमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. या बदलांचा थेट परिणाम दैनंदिन बँकिंग व्यवहारांवर होणार आहे.

१) ATM व्यवहार आता अधिक खर्चिक

नव्या नियमांनुसार, ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या नेटवर्कच्या बाहेरच्या ATM मधून पैसे काढण्यासाठी आणि बॅलेन्स चेक करण्यासाठी जास्त शुल्क द्यावे लागणार आहे. यापूर्वी प्रत्येक व्यवहारासाठी १७ रुपये शुल्क घेतले जात होते, ते वाढवून १९ रुपये करण्यात आले आहे. तसेच, बॅलेन्स चेक करण्यासाठी आधी ६ रुपये आकारले जात होते, आता हे शुल्क ७ रुपये असेल.

२) डिजिटल बँकिंगमध्ये नवी सुरक्षा आणि सुधारणा

डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित आणि सोपे करण्यासाठी बँकिंग क्षेत्रात सुधारणा करण्यात आल्या आहेत. ग्राहकांच्या सोयीसाठी एआय (AI) आधारित चॅटबॉट्स आणि टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन, तसेच बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग अधिक विश्वासार्ह आणि जलद होईल.

३) मिनिमम बॅलेन्स नियमांमध्ये बदल (Bank Rules Change)

एसबीआय (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि कॅनरा बँक यांसारख्या काही बँकांनी त्यांच्या खात्यांसाठी मिनिमम बॅलेन्स नियमांमध्ये बदल केले आहेत. खातेदाराचे खाते शहरी, निमशहरी किंवा ग्रामीण भागात आहे का, यावर हा मिनिमम बॅलेन्स ठरणार आहे. जर खातेधारकाने ठराविक मर्यादेपेक्षा कमी बॅलेन्स ठेवला, तर त्याला अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

४) सेव्हिंग अकाउंटवरील व्याजदरात बदल

१ एप्रिलपासून अनेक बँका त्यांच्या सेव्हिंग अकाउंट आणि मुदत ठेवी (Fixed Deposit – FD) वरील व्याजदरात बदल करणार आहेत. नव्या धोरणानुसार, सेव्हिंग अकाउंटवरील व्याज हा खात्यातील शिल्लक रकमेवर अवलंबून असेल. म्हणजेच, ज्या ग्राहकांचा खात्यात जास्त बॅलेन्स असेल, त्यांना तुलनेने अधिक व्याज मिळणार आहे.

दरम्यान, या बदलांमुळे ग्राहकांना त्यांच्या बँक खात्याशी संबंधित व्यवहारांमध्ये अधिक सतर्क राहावे लागेल. जास्त शुल्क लागू नये यासाठी ATM वापरण्यापूर्वी शुल्कविषयी माहिती घ्यावी. तसेच, मिनिमम बॅलेन्सच्या नियमांमध्ये बदल असल्याने खात्यात पुरेसा शिल्लक ठेवावा, जेणेकरून अतिरिक्त शुल्क द्यावे लागू नये.