Bank Holiday: ताबडतोब बँकेची कामे उरकून घ्या!! पुढील आठवड्यात 4 दिवस बँकांना असेल टाळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bank Holiday| आता सर्व गोष्टी ऑनलाइन पद्धतीने होत असल्या तरी काही महत्त्वाच्या कामांसाठी बँकेतच जावे लागते. परंतु अनेकवेळा बँकेत गेल्यानंतर समजते की आज बँकेला सुट्टी आहे. यामुळे पुन्हा एकदा बँकेची कामे खोळंबून राहतात. हीच वेळ उद्या तुमच्यावर येऊ नये म्हणून आम्ही सांगू इच्छितो की, पुढील आठवड्यामध्ये बँकांना एकूण चार दिवस सुट्टी असणार आहे. मतदानाच्या प्रक्रियेमुळे तसेच सणावारांमुळे विविध तारकांना देशातील काही ठराविक बँका बंद राहणार आहेत. या बँका नेमक्या कोणत्या असतील आणि त्यांना कोणत्या तारखेला सुट्टी असेल?? याविषयी सविस्तर वाचा. (Bank Holiday)

येत्या 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे ज्या ज्या शहरांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे, तेथील बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. येत्या 19 मे रोजी रविवार असल्यामुळे बँकेला सुट्टी राहील. (Bank Holiday) त्यानंतर 20 मे रोजी मतदानामुळे बँका बंद राहते. या 20 मे रोजी राज्यातील सहा राज्य आणि 49 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे येथील बँका त्या दिवशी बंद राहतील. त्यामुळे बँकेत काम असणाऱ्या व्यक्तींचा खोळंबा होईल.

येत्या 20 मे रोजी बँका बंद असणाऱ्या राज्यांमध्ये लडाख, ओडिशा, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, बिहार आणि जम्मू काश्मीर अशा राज्यांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि बेलापूर बँका (Bank Holiday) बंद राहणार आहेत. यानंतर 23 मे रोजी बुद्धपौर्णिमा असल्यामुळे बँका बंद राहतील. त्यानंतर लगेच 25 मे रोजी मतदानाचा सहावा टप्पा असल्यामुळे त्या त्या शहरातील बँका बंद असतील. 25 मे रोजी चौदा शनिवार आणि 26 मे रोजी रविवार असल्यामुळे या दोन्ही दिवशी बँकांना सुट्टी असेल.

वर दिलेल्या तारखांच्या दिवशी बँकांचा प्रत्यक्ष कार्यालयीन व्यवहार बंद (Bank Holiday) राहणार आहे. परंतु डिजिटल बँकिंग, मोबाईल अॅप, एटीएम आणि नेट बँकिंग अशा सर्व सुविधा सुरू राहतील याची खातेधारकांनी नोंद घ्यावी. तसेच, बँकांच्या सुट्ट्या तपासून आपली कामे आटपून घ्यावी.