आजपासून ‘या’ शहरांमध्ये रविवारपर्यंत बँका बंद राहणार, सुट्ट्यांची यादी येथे तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर तुमच्याकडे बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल, तर हे लक्षात घ्या की, आजपासून म्हणजेच 8 सप्टेंबरपासून सलग 5 दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. पण या सुट्ट्या देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या आहेत. अशा परिस्थितीत, बँकेत जाण्यापूर्वी, कोणत्या तारखांना (Bank Holidays in September 2021) बँका बंद राहतील हे जाणून घेणे आवश्यक आहे.

सुट्ट्यांच्या यादीत काही सुट्ट्या अशा आहेत ज्या केवळ स्थानिक राज्य स्तरावरच प्रभावी आहेत. या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये राहणार नाही कारण काही सण किंवा उत्‍सव संपूर्ण देशात एकाच वेळी साजरे केले जात नाहीत.

या शहरांमध्ये बँका 5 दिवस बंद राहतील
>> 8 सप्टेंबर श्रीमंत शंकरदेव तिथि बँक गुवाहाटी मध्ये बंद राहतील.
>> 9 सप्टेंबर हरितलिका तीज तसेच महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी बँक गंगटोकमध्ये बंद राहतील.
>> 10 सप्टेंबर गणेश चतुर्थी बँका हमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, नागपूर आणि पणजी येथे बंद राहतील.
>> 11 सप्टेंबरचा दुसरा शनिवार बंद राहतील.
>> रविवार 12 सप्टेंबर मुळे सर्व राज्यांच्या बँका बंद राहतील.

सर्व राज्यांसाठी वेगवेगळे नियम
RBI च्या वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार (Bank Holidays List September 2021), सप्टेंबरमध्ये एकूण 12 दिवस बँका बंद राहतील. यामध्ये साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे. RBI च्या वेबसाईटवर सुट्ट्यांची यादी देण्यात आली आहे.

RBI ची अधिकृत साइट तपासा
बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइटला https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx भेट देऊ शकता.

Leave a Comment