‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावर बंदी घाला, मावळा संघटनेने केली मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करून भाजपा नेता व पुस्तक लेखक भगवान गोयल यांनी शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असून, महाराजांची तुलना जगातील कोणत्याही व्यक्तीशी होऊच शकत नाही ! असे म्हणत सदरील लेखकावर तात्काळ कारवाई करत पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी मावळा संघटनेच्या वतीने आज पाथरी तहसीलदारांना निवेदन देत करण्यात आली.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य अतुलनीय आहे, त्यांच्या कार्याची जगाच्या पातळीवर कोणीही तुलना करू शकत नाही , भाजपा नेते भगवान गोयल यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजां सोबत केल्याने व अशा प्रकारचे पुस्तक लिहून गोयल यांनी नीच पातळी गाठत, महाराष्ट्रातील व जगभरातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत . त्यामुळे याविषयी सर्व स्तरांमधून निषेध नोंदवला जात आहे. परभणी जिल्ह्यातील शिवप्रेमींच्या भावना तीव्र असून ठिकाणी याचा निषेध करण्यात येत आहे .पाथरी तहसीलदारांना आज देण्यात आलेल्या निवेदनामध्ये सदरील लेखकावर कारवाई करावी व या वादग्रस्त पुस्तकावर बंदी आणावी असेही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी मावळा युवा महासंघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अमोल भाले पाटील ,वक्ता जिल्हा अध्यक्ष सुनील जाधव ,युवक जिल्हाध्यक्ष अतुल टेकाळे, पुरोगामी विचारमंच चे तालुका प्रभारी सतीश गवारे, तालुका उपप्रभारी महादेव गवारे ,तालुका सल्लागार अनिल गालफाडे,वकील अॅड. बी .जे गायकवाड , राजेश नवले ,गणेश थावरकर, चक्रधर टेकाळे ,माऊली काळे, किशन भाले पाटील, राहुल वानखेडे ,राजेंद्र माने यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमींची उपस्थिती होती.

दरम्यान निवेदनात नमुद मागणीनुसार कारवाई न झाल्यास, मावळा युवा संघाच्या वतीने राज्यभरात तीव्र प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल अशी माहिती मावळा युवा महासंघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अमोल भालेपाटील यांनी यावेळी माध्यमांशी बोलतांना दिली.

Leave a Comment