साहेब, 5 वर्ष कुठे होतात?? शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्याविरोधात बॅनरबाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिरूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील (Amol Kolhe Vs Shivaji Adhalrao Patil) यांच्यात लढत होणार आहे. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा खासदारकीची निवडणूक लढवत आहेत तर आढळराव पाटील हे अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही राष्ट्रवादीमध्येच शिरूरची लढत होणार असल्याचे संपूर्ण महाराष्ट्र्राचे लक्ष्य या मतदासंघात आहेत. दोन्ही नेत्यांकडून आपापल्या प्रचाराला सुरुवात पण करण्यात आली आहे. त्याच दरम्यान, शिरूर मध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात बॅनरबाजी करत काही प्रश्न कोल्हे याना विचारण्यात आले आहेत.

काय लिहिले बॅनरवर ??

आंबेगाव तालुक्यातील गंगापुर फाट्यावर एका सुज्ञ मतदाराच्या नावे एक फलक लावत अमोल कोल्हे यांना काही प्रश्न विचारले आहे. विद्यमान खासदार साहेब पाच वर्ष तुम्ही कुठे होता. कोरोना सारख्या भयंकर परिस्थितीमध्ये तुम्ही मतदारसंघांमध्ये का नव्हता. पाच वर्षे मतदारसंघात नाही पण प्रचारासाठी तुम्हाला वेळ कसा भेटला? खासदार साहेब उत्तर द्या एक सुज्ञ मतदार, अशा आशयाचा बॅनर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर सुद्धा हा बॅनर (Banner Against Amol Kolhe) चांगलाच व्हायरल होत आहे.

शरद पवारांच्या नावाने मते मागण्याचे दिवस संपले –

दरम्यान, अमोल कोल्हे यांचे प्रतिस्पर्धी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांच्या नावाने मत मागण्याचे तुमचे दिवस गेलेत, शरद पवारांना आम्ही विसरु शकत नाही, मला आजही शरद पवारांबद्दल आदर आहे. मात्र अमोल कोल्हे शरद पवारांचे नाव घेऊनच प्रचार करत असून कोल्हेंकडे दुसरं भांडवलच नाही अशी टीका आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर केली.