हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीकडून गावच्या विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जातात. मात्र, काही मोजक्याच अशा ग्रामपंचायती असतात की त्या एतिहासिक ठराव करतात. अशा ग्रामपंचायतीत कराड तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. कारण या ग्रामपंचायतीच्य ग्रामसभेत गावातील मुस्लिम बांधवांच्या दर्ग्यातील भोंगा हा मुस्लिम बांधवांच्या राष्ट्रीय सणादिवशीच सुरू ठेवण्यात येणार असल्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
बनवडी, ता. कराड येथे नुकतीच ग्रामसभा पर पडली. यावेळी ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रदीप पाटील होते. यावेळी भोंग्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयास सर्वांनी एकमताने मंजुरी दिली. यावेळी उपसरपंच मोहन जानराव, सदस्य विकास करांडे, शंकरराव खापे, पांडुरंग कोठावळे, अख्तर हुसेन आतार, अलका पाटील, ग्रामविकास अधिकारी दीपक हिनुगले, पोलिस पाटील रोहित पाटील उपस्थित होते.
यावेळी ग्रामसभेत हजरत खैरत पीर देवस्थानला लागून असलेली दफनभूमी आजपासून बंद करून हजरत पीर दर्गा परिसरातील देवस्थान इमारतीच्या क्षेत्रातील भाग सोडून वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जागेमध्ये फक्त हजरत पीर दर्गा ट्रस्टच्या कुटुंबीयांचंच दफन करण्यात यावी. तसेच ही दोन गुंठे जागा दफनभूमीसाठी हजरत पीर ट्रस्ट व ग्रामपंचायत कार्यकारिणी यांच्या संमतीने घेऊन त्याला ट्रस्टकडून कंपाउंड करण्याचा ऐतिहासिक निर्णय ट्रस्टींच्या उपस्थितीत सर्वानुमते घेण्यात आला. karad Mosque Muslim Community Hindu Muslim