Monday, February 6, 2023

‘याठिकाणी असं..केल्यानं’ बारामती कोरोनामुक्त झालं- अजित पवार

- Advertisement -

पुणे । काल पुण्याच्या ससुन हॉस्पिटलमधून कोरोनाची लागण झालेल्या ७५ वर्षीय बारामतीतील अखेरच्या रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्याने बारामती शहर सध्या करोनामुक्त झालं आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनामुक्त बारामतीचं सर्व श्रेय कोरोनाविरोधातील लढ्यात हातभार लावणाऱ्या प्रत्येकाला दिलं. “बारामतीकरांनी ‘लॉकडाउन’चे सर्व नियम काटेकोरपणे पाळल्यामुळेच हे शक्य झालं” असं अजित पवार यांनी नमूद केलं. याशिवाय, अशाचप्रकारे महाराष्ट्रही लवकरच करोनामुक्त होईल, असा विश्वास त्यांनी ट्विटरवर व्यक्त केला.”

“कोरोनामुक्त बारामतीचं सर्व श्रेय हे डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी, महसूल विभाग, नगर परिषद,सर्व नगरसेवक,ग्राम प्रशासन व पदाधिकारी यांना जातं. अनेक सामाजिक संस्थांनी देखील या लढाईत हातभार लावला. तमाम बारामतीकरांनी ‘लॉकडाउन’चे सर्व नियम काटेकोरपणे पाळल्यानं हे शक्य झालं आहे. त्यासाठी मी सर्वांचं अभिनंदन करतो! अशाच पद्धतीनं महाराष्ट्रसुद्धा लवकरच करोनामुक्त होईल, असा मला विश्वास आहे”,अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी ट्विटरवर दिली आहे.

- Advertisement -

बारामती शहर व तालुक्यात मिळून एकूण ८ करोनाग्रस्त रुग्ण आढळले होते. त्यापैकी २ रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला होता. दरम्यान, उर्वरित ६ कोरोनाबाधित रुग्णानापैकी अखेरच्या रुग्णाला बरे झाल्यानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. आता बारामतीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नसून हे शहर आता कोरोनमुक्त झालं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.