Baramati Lok Sabha Result 2024: आज म्हणजेच 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. या निकालासाठी आज सकाळीपासूनच मतमोजणी सुरू झाली आहे. या मतमोजणीनुसारच, अजित पवार गटाला बारामती लोकसभा मतदारसंघात आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठा फटका बसणार असल्याचे दिसत आहे. कारण की शिरूरमधून अमोल कोल्हे तर बारामतीमधून खासदार सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत.
राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यापासून अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट राजकिय वर्तुळात निर्माण झाले आहे. या फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार शरद पवारांच्या विरुद्ध लढताना दिसत आहेत. यालाच एक भाग म्हणून अजित पवार गटातून बारामतीतून सुनेत्रा पवार उभे आहेत तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे या उभ्या आहेत. या दोन्हींमध्ये बारामतीत नेमका विजय कोण मिळवले याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
सुप्रिया सुळे 11 हजार मतांनी आघाडीवर (Baramati Lok Sabha Result 2024)
सुरू असलेल्या मतमोजणीनुसार पाहायला गेलो तर, सध्या बारामतीतून सुप्रिया सुळे 11 हजार मतांनी आघाडीवर आहेत. यातूनच बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांना साथ दिली नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. तसेच शिरूर मतदार संघातूनही 18 हजार मतांनी आघाडीवर आहे. त्यामुळे शिरूर मतदार संघामध्ये अजित पवार गटाकडून उभ्या राहिलेल्या
आढाळराव पाटील यांना हार पत्करावी लागेल अशी दाट शक्यता दिसत आहे.