कात्रीला कात्रीचं! लॉकडाऊनमध्ये दाढी-कटिंगची दुकान बंदच राहणार- केंद्रीय गृहमंत्रालय

नवी दिल्ली । करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे देशभरात दुकानं, मॉल्स बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठा निर्णय घेत शनिवारपासून देशभरातील दुकानं उघडण्याची सशर्त परवानगी दिली. परंतु कोणती दुकानं उघडी ठेवावीत, कोणती नाही याबाबत मात्र सर्वांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. त्यावर शनिवारी सकाळी गृह मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. देशभरातील दुकान उघडण्याचा निर्णय झाल्यापासून अनेकांमध्ये आनंदच वातावरण निर्माण झालं होत. विशेषकरून गेल्या महिनाभरापासून ज्यांच्या केसाला कात्री आणि दाढीला वस्तरा लागला नाही अशांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. दरम्यान, गृहमंत्रालयानं दाढी-कटिंगची सलून सुरु करण्याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे.

केशकर्तनालये म्हणजेच सलून ही सेवा प्रकारात येतात. केंद्र सरकारने केवळ सामान विकणाऱ्या दुकानांनाच सुरू करण्याची परवानगी दिली आहे. न्हाव्यांची दुकाने किंवा केशकर्तनालये सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले नाही. दारूची दुकाने उघडण्याचाही सरकारचा कोणताही आदेश नाही अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी दिली आहे. याचसोबत केंद्राच्या आदेशात रेस्टॉरन्ट्सही उघडण्याची अनुमती देण्यात आली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, गेल्या महिनाभरात वाढलेली दाढी आणि वाढलेल्या केसांना वैतागलेल्या जनतेच्या केसांना लागणाऱ्या कात्रीला केंद्राने कात्री लावली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

You might also like