ख्यातनाम विधिज्ञ हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । कुलभूषण जाधवांची बाजू आंतरराष्ट्रीय कोर्टात मांडणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रिटनच्या न्यायमंत्रालयाने १३ जानेवारी रोजीच नव्या नियुक्त्यांसंदर्भातील यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत हरीश साळवे यांच्या नावाचाही समावेश आहे.

हरीश साळवे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या वरुड या गावात झाला. साळवे यांचे आजोबा पी. के. साळवे हे प्रख्यात क्रीमिनिल लॉयर होते. तर त्यांचे पणजोबा हे न्यायाधीश होते. साळवे यांचे वडील एन. के. पी. साळवे हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते. बॅरिस्टर हरीश साळवे हे आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू भक्कम करणारं हे नाव. देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये समाविष्ट असलेलं नाव.

कायद्याच्या धीरगंभीर वातावरणात असलेल्या हरीश साळवे यांची वेगळी बाजूही आहे. कारण साळवे हे संगीतप्रेमी असून, त्यांना चक्क पियानो वाजवण्याचा छंद आहे. इतकंच नाही, तर संगीत याच विषयात एके दिवशी आपण ऑक्सफर्ड विद्यापीठातही तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन करण्याचा विश्वास त्यांना आहे. साळवे जितके निष्णात कायदेतज्ज्ञ आहेत. तितकेच त्यांचे शौक मोठे आहेत.

 

Leave a Comment