बार्शीत भूमी अभिलेख कार्यालयातील परिक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । बार्शीतील भूमी अभिलेख कार्यालयातील परिक्षक भूमापक कुरेशी यांना एक हजाराची लाच घेताना अटक पोलिसांनी अटक केली आहे. तक्रारदार यांनी त्यांचे बार्शी येथील मालमत्तेवर कर्ज घेतले होते. सदर कर्जाच्या बोजाची मालमत्ता पत्रकावर नोंद घेऊन ते मालमत्ता पत्रक देण्यासाठी लिपीक कुरेशी व खाजगी इसम सुधीर लोंढे यांनी १ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. सदर लाच स्वीकारत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडत अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कर्जाची मालमत्ता पत्रकावर नोंद घेवून मालमत्ता पत्रक मिळण्यासाठी तक्रारदार यांच्या आईने उपअधिक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, बार्शी येथे अर्ज दिला होता. तसेच त्यासाठी आवश्यक असलेले सर्व कागदपत्र देखील सादर केले होते. परंतू त्यावरून मालमत्ता पत्रकावर अद्याप नोंद घेतली नव्हती.

त्यामुळे अर्जदार यांनी हे काम पाहणारे लिपीक कुरेशी व त्यांना कामात मदत करणारे खाजगी इसम सुधीर लोढे यांची भेट घेतली असता त्या दोघांनी तक्रारदाराकडे लाच मागितली होती. परंतू तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी त्याबाबत सविस्तर तक्रार अन्टी करप्शन ब्युरो, सोलापूरकडे तक्रार केली होती. त्यावरून सदर तक्रारीची अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूर यांच्याकडून पडताळणी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या परीरक्षकाला ताब्यात घेतले.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.   

Leave a Comment