“सीमावाद आहे न्यायालयात असताना तुम्ही विधानसभेत ठराव घेतलाच कसा”; रोहित पवारांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात सीमावादावरून घमासान चालू आहे. या सीमावादावरून राज्यात टोकाचे राजकारण चालू झाले आहे. या सीमावादावरून दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची चर्चा झाली होती. त्यानंतर हे प्रकरण सामोपचाराने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्यावेळी सांगण्यात आले होते. यानंतरदेखील बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी चिथावणीची भाषा आणि वक्तव्य चालूच ठेवली होती. एवढंच नाहीतर बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी काल कर्नाटक विधानसभेत महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही असा ठराव पास केला.

यावरून रोहित पवार यांनी सीमावादावर बोलताना कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला. यावेळी त्यांनी सीमावादाचा प्रश्न हा न्यायालयात असतानाही कर्नाटकच्या विधानसभेत हा ठराव पारीत होऊच कसा शकतो असा सवालदेखील उपस्थित केला आहे. त्यामुळे न्यायालयाविरोधात जाऊन हा ठराव पास करणाऱ्या कर्नाटक सरकारचा (Basavaraj Bommai) मी जाहीर निषेध करतो म्हणत त्यांनी कर्नाटक सरकारवर जोरदार टीका केली.

याअगोदर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सीमावादावर बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवरही वादग्रस्त टीका केली होती. बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी संजय राऊत यांना देशद्रोही असंही म्हटले आहे. संजय राऊत म्हणजे चीनचे एजंट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रोहित पवार यांनी एका महाराष्ट्रातील खासदारवर टीका होऊनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गप्प का? असा सवालदेखील महाराष्ट्र सरकारला विचारला आहे.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या