कोरोनाने दिला ‘बॅटमॅन’ला धक्का; रिलीज डेट लांबली तर ‘हे’ ४ सुपरहिरो चित्रपट सुद्धा राहणार डब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये आहे. कोरोनामुळे जगभरातील लोक सध्या त्रस्त होऊन आपल्या घरातच कैद झाले आहेत. लॉकडाउनमुळे चित्रपट निर्मिती उद्योग तर पार ठप्पच झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण जगात एकही नवा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. परिणामी चित्रपटगृह देखील ओसाड पडली आहेत. या पार्श्वभूमीवर ‘द बॅटमॅन’ या चित्रपटाची नियोजित प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

‘बॅटमॅन’ हा सर्वाधिक लोकप्रिय सुपरहिरोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. या काल्पनिक व्यक्तिरेखेला यंदाच्या वर्षी तब्बल ८० वर्ष पुर्ण झाली. या निमित्ताने वॉर्नर ब्रदर्स प्रोडक्शन कंपनी चाहत्यांसाठी काहीतरही धमाकेदार करण्याचा प्रयत्न करणार होती. त्यासाठी एक दोन नव्हे तर तब्बल पाच चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती. परंतु कोरोना विषाणूमुळे त्यांच्या या नियोजनावर पाणी फेरले.

येत्या २५ जूनला द बॅटमॅन’ हा एक सुपरहिरोपट हा चित्रपट संपूर्ण जगात प्रदर्शित होणार होता. परंतु करोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे आता थेट पुढच्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.हे सर्व चित्रपट आता दर्शकांना पुढच्या वर्षीच पाहता येतील असे संकेत निर्मात्यांनी दिले आहेत. बॅटमॅनसोबतच डीसी युनिव्हर्सचे ‘वंडर वुमन १९८४’, ‘फलॅश पॉईंट’, ‘ब्लॅक एडम’ आणि ‘शेजॅम २’ हे चित्रपट देखील पुढे ढकलण्यात आले आहेत.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”

.

Leave a Comment