Battery Operated Sparypump | सरकार हे शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवूनच अनेक योजना आणल्या जातात. अशातच आता खरीप हंगामातील पेरणी पूर्ण झालेली आहे. आणि अनेक पिकांवर आता फवारण्या करण्याची लगबग चालू झालेली आहे. परंतु यावेळी शेतकऱ्यांना हाताने चालणाऱ्या पंपाचा वापर करून पिकांवर फवारणी करावी लागते. परंतु त्याचा त्यांना शारीरिक त्रास देखील होतो. परंतु आता तुम्हाला सरकारकडून बॅटरीवर चालणारा पंप (Battery Operated Sparypump) मिळणार आहे. या पंपासाठी आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 14 ऑगस्टपर्यंत तुम्ही हा अर्ज करू शकता.
सरकारने कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया यांना आधारित पिकांना चालना देण्यासाठी उत्पादक वाढवणे. मूल्य साखळी विशेष कृती योजना ही 2024 – 25 रोजी सुरू केलेली आहे. यासाठी शेतकऱ्यांना वर्ष चालू वर्षासाठी बॅटरीवर चालणाऱ्या पंपाची फवारणीसाठी अर्ज करता येणार आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
100% अनुदानावर मिळणार फवारणी पंप | Battery Operated Sparypump
शेतकऱ्यांना आता 100% अनुदानावर न्यानो युरियाडीएपी बॅटरी संचलित फवारणी वितरण करण्यात येणार आहे. यासाठी तुम्हाला कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टल द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. याआधी या पंपाचा अर्ज करण्यासाठी 30 जून शेवटची तारीख होती. परंतु आता ती मुदतवाढ केलेली आहे. या साठी तुम्ही 14 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकता.
अर्ज कसा करा
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला शेतकऱ्यांचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.
- त्यानंतर अर्ज करा वर क्लिक करा.
- त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण आणि बाबी निवडा यावर क्लिक करा.
- त्यानंतर तपशील बाबींवर क्लिक करून मनुष्य चालत अवजारे घटक निवडणे.
- त्यानंतर पीक संरक्षण अवजारे निवडणे.
- अशाप्रकारे तुम्ही या बॅटरीवर चालणाऱ्या पंपासाठी अर्ज करू शकता.