Monday, January 30, 2023

‘बाटु’चे मुख्य कार्यालय आता ‘इथे’ असणार; उदय सामंत यांची माहिती

- Advertisement -

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नीकल युनिव्हर्सिटीचे विभागीय कार्यालय औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरु करण्याचा निर्णय घेण्यात असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. आता जिल्ह्यात शैक्षणिक संस्थेत वाढ होणार आहे.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध शासकीय संस्थांचा आढावा सामंत यांनी बुधवारी घेतला. याबरोबरच तंत्रशास्त्र विद्यापीठ विभागीय केंद्राबाबत आढावा घेण्यात आला. उपकेंद्र उभारणी, सक्षमीकरण याबाबत निर्णय करण्यात असून उपक्रेंद्राला लागणारी दोन ते अडिच हजार स्क्वेअर फूट जागा शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

दरम्यान, त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सहसंचालक तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, औरंगाबाद या विभागाच्या अंतर्गत मयत कर्मचाऱ्यांच्या सहा वारसांना आज अनुकंपा तत्वावर नौकरीचे आदेश प्रदान करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.