परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात आजही समाज बहीष्काराची अधोगामी शस्त्र वापरली जात असल्याचा संतापजनक प्रकार परभणी जिल्हामध्ये सोनपेठ तालुक्यातील नैकोठा गावात निर्दशनास आला आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्याने येथील बौद्ध समाजातील लोकांचे जगणे तीन महीने कठीण झाले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
28 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे गावात आयोजन करण्यात आले होते. याच दिवशी गावात दुसऱ्या समाजातील धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जयंती उत्सव व गावातील लोकांची यावेळी क्षुल्लक कारणावरून वादावादी झाली. दुसर्या दिवशी सोनपेठ पोलीस ठाण्यात सार्वजनिक जयंती कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण करणा-यांच्या विरोधात अनुसुचित जाती जमाती प्रतिबंध कायद्या प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर गावकर्यांनी वस्तीवरिल लोकांशी दैनंदिन व्यवहार बंद केल्याने वस्तीवरील लोकांचे जीवन मागील तीन महिन्यापासुन विस्कळीत झाल आहे. गावात व शिवारात हाताला काम बंद झाल्याने अनेक जण स्थलांतर करण्याच्या मानसिकतेत दिसत आहेत. दरम्यान सोनपेठ तालुका प्रशासनाकडून दोन्ही समाजात बोलणी झाली असुन आता वाद संपला असल्याने सर्व व्यवहार सुरळीत असल्याचे सांगण्यात आलं आहे.