वसुंधरा दिनानिमित्त बायसन नेचर क्लबची राधानगरी अभयारण्यात पाणवठे स्वच्छता मोहिम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी | जागतिक वसुंधरा दिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या राधानगरी अभयारण्य परिसरात दरवर्षी प्रमाणे बायसन नेचर क्लबच्या वतीने पाणवठा स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करणेत आला आहे. यावर्षी कोरोना संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर प्राणी पक्षी मुक्त संचार करत असलेले राधानगरी परिसरात नित्याचे दिसत आहेत पण पाण्याअभावी त्यांचे हाल होत आहेत. अनेक प्राणी पाण्यासाठी गावाजवळील शेतात येऊन शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे दरवर्षी ही मोहीम व्यापक प्रमाणात नेचर क्लब तर्फे राबवण्यात येते.

बायसनच्या कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करून हे पाणवठे स्वच्छ केले. जागतिक वसुंधरा दिनानिमित्ताने आजपासून वेगवेगळे पाणवठे स्वच्छ करण्यात आले आहे. वन्यजीव विभागाने परवानगीने लवकरच टँकरद्वारे पठारावरील पाणवठ्यात पाणी सोडण्यात येणार आहे. या मोहिमेत गतवर्षी वेगवेगळ्या दानशूर व्यक्ती, संस्थांच्या मदतीतून 40 टँकर पाणी पाणवठ्यावर टप्या टप्याने सोडण्यात आले होते. या मोहिमेमुळे अनेक पाणवठे पुनर्जिवित होत आहेत. या मोहिमेत नेचर क्लबचे अध्यक्ष सम्राट केरकर, रुपेश बोंबाडे, गणेश डब्बे, अक्षय केरकर,सनथ केरकर यांनी सहभाग घेतला.

Leave a Comment