ICC आणि BCCI ने विराट कोहलीला दिल्या हटके स्टाईल शुभेच्छा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सर्वोत्तम फलंदाज  विराट कोहली याने सोशल मीडियावरून तो बाप होणार असल्याची माहिती सर्वांना दिली. विराटने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करून सर्वाना ही गोड बातमी दिली.विराटसह अनुष्काने देखील सोशल मीडियावरून आई होणार असल्याचे सांगितले. विरुष्काने ही गोड बातमी दिल्यानंतर विराटचे चाहते, क्रिकेटपटू आणि सिनेजगतातून या दोघांवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

या घोषणेनंतर भारतीय संघातील त्याचे सहकारी आणि चाहते सोशल मीडियावरून शुभेच्छा देऊ लागले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने देखील विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना शुभेच्छा दिल्या. बीसीसीआयने अभिनंदन विराट आणि अनुष्का असे म्हणत एक ट्विट केले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने त्यांच्या अनोख्या स्टाइलमध्ये विराट कोहलीला शुभेच्छा दिल्या.

अनुष्का आणि विराट दोघंही पहिल्यांदा २०१३ मध्ये एकमेकांना भेटले होते. तेव्हा एका जाहिरातीत त्यांनी एकत्र काम केले होते. यावेळी दोघांची चांगली मैत्री झाली आणि लवकरच ते एकमेकांना डेटही करू लागले होते.तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ११ डिसेम्बर २०१७ मध्ये दोघांनी इटलीमध्ये राजेशाही थाटात लग्न केले.

Leave a Comment